शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

Nirmala Sitharaman : पेट्रोल-डिझेलच्या दरांत होणार घट?; अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "केवळ केंद्र सरकारलाच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 17:12 IST

Petrol Diesel Price Hike : गेल्या अनेक दिवसांपासून वाढत आहेत पेट्रोल डिझेलच्या किंमती, अनेक ठिकाणी पेट्रोलनं गाठली शंभरी

ठळक मुद्देअनेक ठिकाणी पेट्रोलनं गाठली शंभरीगेल्या अनेक दिवसांपासून वाढत आहेत पेट्रोल डिझेलच्या किंमती

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलडिझेलच्या  Petrol diesel किंमतीत दरवाढ होत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दरानं शंभरी पार केली. यावरून विरोधकांकडून सातत्यानं केंद्र सरकारवर टीका होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सवाल करण्यात आला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला यावर बसून चर्चा करावी लागेल असं उत्तर दिलं. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेवरही भाष्य केलं. आम्हाला काही असे संकेत मिळाले आहेत ज्यावरून अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचं दिसून येत आहे, असं त्या म्हणाल्या."पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना बसून चर्चा करावी लागेल. इंधनाच्या किंमतीवर एक्ससाईज ड्युटी लागते. त्याचा जवळपास ४१ टक्के हिस्सा हा राज्यांकडे जातो. अशातच किंमती वाढण्यासाठी केवळ केंद्र सरकार जबाबदार आहे असं म्हणणं अयोग्य आहे," असंही निर्मला सीतारामन म्हणाल्या. "या प्रकरणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी चर्चा केली पाहिजे. केवळ केंद्र सरकारच इंधनावर शुल्क आकारत नाही. यावरील शुल्क राज्य सरकारकडूनही घेतलं जातं. जेव्हा पेट्रोलियम पदार्थांवर महसूल मिळतो त्याचा ४१ टक्के भाग राज्य सरकारला जातो," असंही सीतारामन यांनी नमूद केलं. यापूर्वीही निर्मला सीतारामन Nirmala Sitharaman यांनी याप्रकरणी आता काहीही बोलणं म्हणजे घाई केल्यासारखं होईल असं म्हटलं होतं. "आम्ही देशातील लोकांच्या गरजा समजू शकतो. याबाबत आता काहीही सांगता येणार नाही. परंतु या प्रकरणी सरकारच्या समोर धर्मसंकट आहे," असं त्या म्हणाल्या होत्या. इंधनाच्या किंमती वाढण्याची शक्यताजगात कच्च्या तेलाचे उत्पादक असलेल्या प्रमुख देशांची संघटना OPEC+ नं एक मोठं पाऊल उचललं आहे. OPEC+ नं कच्च्या तेलाच्या उत्पादनात करण्यात येत असलेली कपात एप्रिल महिन्यापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही त्यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली होती. दरम्यान, आता केंद्र सरकारनं करात सूट दिली नाही तर येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

टॅग्स :nirmala sitharamanनिर्मला सीतारामनPetrolपेट्रोलDieselडिझेलGovernmentसरकार