Ninth student pregnant in Odisha | ओडिशात नववीची विद्यार्थिनी गर्भवती
ओडिशात नववीची विद्यार्थिनी गर्भवती

मलकानगिरी : ओडिशाच्या नबरंगपूर जिल्ह्यात एका सरकारी आदिवासी निवासी शाळेतील नववी वर्गातील एक विद्यार्थिनी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मलकानगिरी जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलगी नबरंगपूरच्या विद्यालयात शिकत आहे.

जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक पटनायक यांनी सांगितले की, या गर्भवती मुलीला साक्षी सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते या विद्यार्थिनीचे समुपदेशन करतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही विद्यार्थिनी काही दिवसांसाठी मलकानगिरी जिल्ह्यातील आपल्या घरी गेली होती.

जेव्हा ती तेथून परत आली तेव्हा नियमित तपासणीत गर्भवती आढळून आली. यापूर्वी कोरापूट जिल्ह्यातील एका आदिवासी विद्यालयातील दहावी कक्षेतील एक विद्यार्थिनी ४ डिसेंबर रोजी नियमित तपासणीत गर्भवती आढळून आली होती, तसेच कोरापूट जिल्ह्यातील अन्य एका आदिवासी विद्यालयातील एक प्रकरण समोर आले होते.

Web Title: Ninth student pregnant in Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.