एनआयएकडून 'या' खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी जाहीर, सर्वांची मालमत्ता होणार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 10:52 AM2023-09-24T10:52:42+5:302023-09-24T10:53:15+5:30

फरार दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली असून, त्यात एकूण 19 नावांचा समावेश आहे.

nia releases new list of 19 khalistani terrorists their property will be confiscated they run anti india propaganda from foreign soil | एनआयएकडून 'या' खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी जाहीर, सर्वांची मालमत्ता होणार जप्त

एनआयएकडून 'या' खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी जाहीर, सर्वांची मालमत्ता होणार जप्त

googlenewsNext

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवाद्यांसंदर्भात भारत आणि कॅनडा यांच्या वादादरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने  (National Investigation Agency) कारवाई तीव्र केली आहे. एनआयएने पंजाबमधील विविध शहरे आणि ठिकाणी असलेल्या 'सिख फॉर जस्टिस' या भारतातील प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत आणि इतर फरारी खलिस्तानी दहशतवाद्यांवर अशीच कारवाई करण्याची तयारी करत आहे. या फरार दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली असून, त्यात एकूण 19 नावांचा समावेश आहे.

एनआयएच्या या यादीत समाविष्ट असलेली सर्व नावे भारतात मोस्ट वॉन्टेड असून त्यांनी ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, दुबई, पाकिस्तानसह इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. या सर्व फरारी खलिस्तानींच्या भारतातील मालमत्ता UAPA च्या कलम 33(5) अंतर्गत जप्त केल्या जातील. हे खलिस्तानी दहशतवादी परदेशातून भारतविरोधी प्रचार करत आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने काही दिवसांपूर्वी 43 फरारी आरोपींची यादी जाहीर केली होती. 

एनआयएच्या नव्याने जाहीर झालेल्या यादीत खालील नावांचा समावेश आहे.
1.परमजीत सिंग पम्मा- ब्रिटन
2.वाधवा सिंग बब्बर- पाकिस्तान
3.कुलवंत सिंग मुथरा- ब्रिटन
4. जेएस धालीवाल- अमेरिका
5.सुखपाल सिंग- ब्रिटन
6.हरप्रीत सिंग उर्फ ​​राणा सिंग- अमेरिका
7.सरबजीत सिंग बेन्नूर- ब्रिटन
8.कुलवंत सिंग उर्फ ​​कांता- ब्रिटन
9.हरजाप सिंग उर्फ ​​जप्पी सिंग- अमेरिका
10.रणजित सिंग नीता- पाकिस्तान
11.गुरमीत सिंग उर्फ ​​बग्गा बाबा- कॅनडा
12.गुरप्रीत सिंग उर्फ ​​बागी- ब्रिटन
13.जस्मीत सिंग हकीमजादा- दुबई
14.गुरजंत सिंग ढिल्लन- ऑस्ट्रेलिया
15. लखबीर सिंग रोडे- कॅनडा
16.अमरदीप सिंग पूरवाल- अमेरिका
17.जतिंदर सिंग ग्रेवाल- कॅनडा
18.दुपिंदर जीत- ब्रिटन
19.एस. हिम्मत सिंग - अमेरिका

गुरुपतवंत सिंग पन्नू याची मालमत्ता जप्त
एनआयएने अमृतसरच्या खानकोट गावात गुरुपतवंत सिंग पन्नू याची जमीन ताब्यात घेतली आहे. ही शेतजमीन आहे. खानकोट हे पन्नूचे वडिलोपार्जित गाव आहे. त्याचे चंदीगडमधील सेक्टर १५ सी येथील घरही एनआयएने जप्त केले आहे. यापूर्वी 2020 मध्ये त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. कायदेशीररित्या, पन्नू आता या मालमत्तांचे मालक नाही. या मालमत्ता आता सरकारच्या मालकीच्या आहेत. 

शीख फॉर जस्टिस संघटनेवर बंदी
भारत सरकारने 2019 मध्ये गुरुपतवंत सिंग पन्नूच्या शीख फॉर जस्टिस संघटनेवर UAPA कायद्यांतर्गत बंदी घातली होती. यासंबंधीच्या गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, शीख जनमताच्या नावाखाली शीख फॉर जस्टिस ही संघटना पंजाबमध्ये फुटीरतावाद आणि अतिरेक्यांना प्रोत्साहन देत आहे. यानंतर, 1 जुलै 2020 रोजी, भारत सरकारने पन्नूला UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले. पंजाबमधील शीख तरुणांना शस्त्रे उचलण्यास आणि फुटीरतावादासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

देशद्रोहाचे गुन्हे
दहशतवादी पन्नू वेळोवेळी भारतविरोधी वक्तव्ये देत असतो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून भारतीय शीखांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या आणि त्याच्या संघटनेच्याविरुद्ध भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत. पंजाबमध्ये पन्नूवर देशद्रोहाचे तीन गुन्हे दाखल आहेत. अलीकडेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजन्सींचा हात असल्याचा आरोप केला होता. यानंतर पन्नूने एक व्हिडिओ जारी करून कॅनडात राहणाऱ्या हिंदूंना भारतात परतण्याची धमकी दिली होती.
 

Web Title: nia releases new list of 19 khalistani terrorists their property will be confiscated they run anti india propaganda from foreign soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.