शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

"पुढची 10 ते 20 वर्षे पंतप्रधान मोदींना पर्याय नाही, कोट्यवधी लोकांचा त्यांच्यावर विश्वास"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 12:10 PM

Ramdev Baba And Narendra Modi : रामदेव बाबा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि दिग्विजय सिंह यांना सल्ला देखील दिला आहे.

नवी दिल्ली - योगगुरु बाबा रामदेव यांनी पुढची 10 ते 20 वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही असं म्हटलं आहे. मी मोदींचा भक्त नाही पण एक राष्ट्रभक्त नक्कीच आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील राष्ट्रभक्त आहे.  त्यामुळे पुढची 10 ते 20 वर्षे त्यांना पर्याय नाही असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. रामदेव बाबा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि दिग्विजय सिंह यांना सल्ला देखील दिला आहे. राहुल गांधी यांनी त्रियोग करावा तर दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा असं त्यांनी म्हटलं आहे.

रामदेव बाबा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे. देशात मोदी फॅक्टर आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता त्यावर "कोट्यवधी लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये खूप मोठा फरक आहे. संपूर्ण देशाला हे माहीत आहे की मोदींना स्वतःसाठी काहीही नको आहे जे काही करायचं आहे ते देशासाठी करायचं आहे. देवाच्या कृपेने त्यांना हे सर्व काही मिळालं आहे" असं उत्तर दिलं आहे. 

"मी मोदीभक्त नाही तर राष्ट्रभक्त"

लोकशाहीत सध्या सर्वत जास्त विश्वास कोणावर आहे असं विचारलं असता भारताच्या राजकारणात सध्या पुढच्या 10 ते 20 वर्षांसाठी तरी मला मोदींना कोणताही पर्याय आहे असं दिसत नाही असं म्हटलं आहे. तुम्ही मोदी भक्त आहात असा आरोप तुमच्यावर सतत होत असतो असं जेव्हा बाबा रामदेव यांना विचारण्यात आलं तेव्हा मी मोदीभक्त नाही तर राष्ट्रभक्त आहे. मी प्रभू, गाव, गरीब, मजूर, शेतकरी, दलित, शोषित, वंचित, मागासवर्गीय यांचा भक्त आहे. मी योगी आहे आणि कर्मयोगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त आहेत त्यामुळे मी त्यांचा सहयोगी आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

रामदेव बाबांच्या पतंजलीने "कोरोनिल"च्या विक्रीतून केली बक्कळ कमाई; फक्त 4 महिन्यांत तब्बल 241 कोटी

रामदेव यांच्या 'पतंजली' समूहाने कोविड-19 आजारावर 'कोरोनिल' या आयुर्वेदिक औषधाची घोषणा केली होती. लाँचिंगपासूनच 'कोरोनिल' वादाच्या भोवऱ्यात सापडलं. यानंतर आता कोरोनिलच्या विक्रीतून पतंजलीने बक्कळ कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. रामदेव बाबा यांच्या पतंजलीने फक्त चार महिन्यांच्या कालावधीमध्ये 85 लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले आहेत. कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपनीने कोरोनिल विकून तब्बल 241 कोटी कमावले आहेत.

 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा