जिया खानच्या आत्महत्येला मिळालं नवं वळण

By Admin | Updated: September 20, 2016 19:06 IST2016-09-20T18:53:01+5:302016-09-20T19:06:39+5:30

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. ब्रिटनमधील न्यायवैद्यक तज्ञांच्या अहवालात जियाची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

The new turn of Jiah Khan's suicide | जिया खानच्या आत्महत्येला मिळालं नवं वळण

जिया खानच्या आत्महत्येला मिळालं नवं वळण

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.20 -  अभिनेत्री जिया खानची हत्या झाल्याचा निष्कर्ष बिटिश तज्ज्ञांनी काढला असून या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. ब्रिटनमधील  न्यायवैद्यक तज्ञांच्या अहवालात जियाची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं आहे. जियाच्या मानेवर आणि तोंडावरील खुणांवरून तिची हत्या केल्याचं स्पष्ट होतं असं या अहवालात म्हटलं आहे.  तिचा आधी खून करण्यात आला आणि नंतर मृतदेह फासावर लटकवण्यात आला असं या अहवालात म्हटल्याचं वृत्त मुंबई मिररनं दिलं आहे.

जियाची आई राबिया खान यांनी ब्रिटनचे फॉरेन्सीक तज्ञ पायने जेम्स यांच्याकडून वैद्यकीय आणि शवविच्छेदन अहवालांची तपासणी करून घेतली होती.  पायने जेम्स यांनी जियाचे मृत्यूनंतरचे फोटो, शवविच्छेदन अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून तिची हत्या करण्यात आल्याचा निष्कर्ष काढला आहे. जियाची हत्या करून तिचा मृतदेह फासावर लटकावण्यात आला व घटनेला आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे.
 
 3 जून 2013 रोजी जिया खानचा मृतदेह तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी तिचा प्रियकर अभिनेता सूरज पांचोली याला 10 जून 2013 रोजी अटक करण्यात आली होती. 

Web Title: The new turn of Jiah Khan's suicide