शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून राष्ट्रवादीला १२४ जागांचा नवा प्रस्ताव

By admin | Updated: September 22, 2014 08:36 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी नव्याने जागांच्या वाटाघाटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना नवा फॉर्म्युला देणारे संदेश पाठवले

नबीन सिन्हा, नवी दिल्लीसमान जागांवर अडून बसलेल्या राष्ट्रवादीला रविवारी काँग्रेसने नवा प्रस्ताव देत १२४ जागा देण्याची तयारी दर्शविली आहे, मात्र समाधान न झालेल्या राष्ट्रवादीने हा प्रस्ताव मान्य केला नसल्याने जागावाटपाचे त्रांगडे कायम आहे.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी नव्याने जागांच्या वाटाघाटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना नवा फॉर्म्युला देणारे संदेश पाठवले आहेत. आघाडी वाचविण्याचा भाग म्हणून काँग्रेसने पूर्वीपेक्षा दहा जागा जास्त देण्याची तयारी दर्शविली. याआधी केवळ ११४ जागा देऊ केल्या होत्या. दोन्ही पक्षांनी १९९९ पासून महाराष्ट्रात आघाडीचे सरकार चालविले असून दोन निवडणुका एकत्र लढल्या आहेत.राष्ट्रवादीचे नेते सोमवारी किंवा मंगळवारी दिल्लीत येतील, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. आॅगस्टमध्ये अखेरची बैठक झाली तेव्हा सोनिया गांधी आणि पवार यांनी एकत्रित निवडणूक लढण्याला मान्यता दिली होती. जागांच्या वाटाघाटीचा मुद्दा प्रदेश नेत्यांवर किंवा समन्वय समितीवर सोपविला होता; मात्र ही समिती कधीही समोर आली नाही. समान जागांसाठी मोहीम उघडणारे प्रफुल्ल पटेल यांनी १२४ जागांचा प्रस्ताव फेटाळला आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादीने ११४ जागा लढविल्या होत्या. काँग्रेसची तेवढ्याच जागा देण्याची यंदा तयारी होती. काँग्रेसच्या निवडणूक समितीने उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया चालवितानाच राष्ट्रवादीला कठोर संदेश दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अल्टिमेटम देत आघाडी स्थापण्यात अपयश आल्यास स्वतंत्र लढण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. शरद पवारांनी आतापर्यंत मौन पाळले आहे.