शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेतेपद वादाला नवे वळण

By admin | Updated: June 17, 2014 00:15 IST

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्यावरून माकपा काँग्रेसच्या पाठीशी उभा झाला आहे आणि हे पद काँग्रेसला देण्याची मागणी या पक्षाने केली आहे

हरीश गुप्ता, नवी दिल्लीलोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्यावरून माकपा काँग्रेसच्या पाठीशी उभा झाला आहे आणि हे पद काँग्रेसला देण्याची मागणी या पक्षाने केली आहे. काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद देण्याचा निर्णय दीर्घ काळ चालत आलेल्या परंपरेला शोभणारा राहील आणि त्यामुळे लोकशाही मूल्यांचेही जतन केले जाईल, असे मत माकपा नेते आणि राज्यसभा सदस्य सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले आहे.येचुरी म्हणाले, राज्यसभेतील कायदा अगदी स्पष्ट आहे आणि सर्वांत मोठ्या पक्षाला विरोधी पक्ष मानण्याची परंपरा आहे. पाच पेक्षा कमी सदस्यसंख्या असलेल्या कोणत्याही पक्षाला गट म्हणून तर पाच पेक्षा जास्त संख्या असलेल्या पक्षाला पक्ष म्हणून मान्यता दिली जाते आणि सर्वात मोठा पक्ष असलेल्या पक्षाला विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळते. तथापि लोकसभेतील परंपरा आणि प्रक्रिया निराळी आहे. परंतु असे असले तरी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद द्यायला पाहिजे. हा मुद्दा सोडविला पाहिजे. ही काळाची गरज आहे.विरोधी पक्षनेत्याची व्याख्या करणारा स्पष्ट असा कायदा नाही. परंतु लोकसभा अध्यक्षाला त्याची व्याख्या करण्याचा अधिकार आहे, असे येचुरी म्हणाले. लोकसभेचे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला देण्यात यावे, अशी मागणी संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी केल्यानंतर लगेच येचुरी यांचे हे वक्तव्य पुढे आले आहे. लोकसभेत काँग्रेसचे ४४ खासदार आहेत. विरोधी पक्ष नेतेपद मिळविण्यासाठी एकूण सदस्यसंख्येच्या दहा टक्के सदस्य असणे आवश्यक आहे. ही संख्या ५४ होते. याआधी ५४ पेक्षा कमी सदस्य असलेल्या कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळालेले नाही.