शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

कुपोषणविरोधी योजनांच्या पाहणीसाठी नवी निरीक्षण पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 5:01 AM

पंतप्रधान मातृवंदना योजनेचा आढावा इंटरनेटच्या माध्यमातून व्यवस्थापन व माहिती (एमआयएस) सॉफ्टवेअरद्वारे घेतला जातो.

नवी दिल्ली : महिला, बालके यांच्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याकरिता असलेल्या योजनांच्या फलश्रुतीची तपासणी करण्यासाठी नवी निरीक्षण पद्धती केंद्र सरकारने अमलात आणली आहे.यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, पोषण अभियान, पंतप्रधान मातृवंदना योजना, अंगणवाडी योजनांची नीट अंमलबजावणी झाली की नाही याची पाहणी केली जाणार आहे. पोषण अभियानाच्या फलश्रुतीचा नीती आयोगाकडून ठराविक कालावधीनंतर आढावा घेतला जातो. पोषण अभियानाची नियमितपणे ही पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय पोषण संसाधने केंद्र - केंद्रीय प्रकल्प निरीक्षण विभागाची (एनएनआरसी-सीपीएमयू) स्थापना करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत जे कार्यक्रम हाती घेतले जातात त्यांचा आढावा या विभागातर्फे घेण्यात येतो.पंतप्रधान मातृवंदना योजनेचा आढावा इंटरनेटच्या माध्यमातून व्यवस्थापन व माहिती (एमआयएस) सॉफ्टवेअरद्वारे घेतला जातो. त्याचप्रमाणे अंगणवाडी योजनेची नीट अंमलबजावणी होते आहे की नाही हे पाहण्यासाठी एक निरीक्षण पद्धती कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेसंदर्भात हाती आलेल्या माहितीची एमआयएसच्या माध्यमातून खातरजमा केली जाते.अंगणवाडी योजनेचा आढावा घेण्यासाठी अंगणवाडी, ब्लॉक, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकारने विशिष्ट प्रकारची निरीक्षण पद्धती लागू केली आहे.किशोरवयीन मुलींसाठी राबविलेल्या योजनांची गाव, ब्लॉक, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर पाहणी करण्यात येते. त्याशिवाय अन्य योजनांचा बैठका व व्हिडिओ कॉन्फरन्स यांच्या माध्यमातून आढावा घेतला जातो.भारतात ४.४६ कोटी कुपोषित बालके- जगातील एकूण कुपोषित मुलांपैकी एक तृतीयांश जण एकट्या भारतातच असल्याचे २०१८च्या जागतिक पोषण अहवालामध्ये म्हटले आहे.- भारतात कुपोषित मुलांची संख्या ४.६६ कोटी असून याबाबतच्या जागतिक यादीत तो पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर नायजेरियामध्ये १.३९ कोटी, पाकिस्तान १.७ कोटी कुपोषित बालके आहेत.

टॅग्स :Indiaभारत