शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

'स्वाक्षरी' केलेला तिरंगा भेट दिल्याने मोदींच्या दौ-यात नवा वाद

By admin | Updated: September 25, 2015 15:24 IST

अमेरिकेच्या दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये सेलिब्रिटी शेफ विकास खन्नाला स्वाक्षरी केलेला तिरंगा झेंडा भेट दिल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे..

ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २५ - अमेरिकेच्या दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये सेलिब्रिटी शेफ विकास खन्नाला स्वाक्षरी केलेला तिरंगा झेंडा भेट दिल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन चोहोबाजूंनी टीका सुरु झाल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने विकासकडून हा तिरंगा परत घेतला आहे. 
प्रथितयश ‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यांपैकी ४७ कंपन्यांचे सीईओ व अध्यक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली.  त्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या डिनरसाठी सेलिब्रिटी शेफ विकास खन्नाने खास जेवण बनवले होते. त्यानंतर मोदींनी विकासची भेट घेऊन त्याचे कौतुक केले व स्वाक्षरी केलेला तिरंगा त्याला भेट दिला. विकास हा तिरंगा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे सूपूर्त करणार होता. मात्र भारतीय संविधानानुसार राष्ट्रीय तिरंग्यावर काहीही लिहीण्यास अथवा रंगरंगोटी करण्यास मनाई असल्याने मोदींची ही कृती वादाच्या भोव-यात सापडली आहे. विकासकडून हा 'स्वाक्षरी' केलेला तिरंगा परत घेण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील अधिका-यांनी दिली. 
 
 
भारतात प्रशासकीय सुधारणांना सर्वोच्च प्राधान्य - मोदी
प्रथितयश ‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यांपैकी ४७ कंपन्यांचे सीईओ व अध्यक्षांसोबत काल झालेल्या बैठकीत मोदींनी त्यांना 'मेक इन इंडिया'चे आवाहन केले. भारतात प्रशासकीय सुधारणांना आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी या बैठकीत सांगितले. 'विविध मंजुऱी प्रक्रिया आम्ही अत्यंत सुलभ  व सुटसुटीत केले असून निर्णय प्रक्रियाही वेगवान व पारदर्शक झाल्याचा दावा' मोदींनी केला. या कार्यक्रमास पेप्सिकोच्या इंद्रा नुयी, फोर्डचे अध्यक्ष मार्क फिल्ड, डाऊ केमिकल्सचे अध्यक्ष अॅंड्र्यू लिव्हेरिस, लॉकहिड मार्टिनचे अध्यक्ष व सीईओ मार्लिन ह्युसन यांच्यासह अनेक महत्वाच्या कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते.