NEET, JEE मुख्य परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या, मनुष्यबळ विकासमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 20:54 IST2020-07-03T20:21:58+5:302020-07-03T20:54:50+5:30
या दोन्ही परीक्षा आता सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आल्या आहेत. मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एक ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

NEET, JEE मुख्य परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या, मनुष्यबळ विकासमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली - विद्यार्थ्यांची मागणी आणि विरोधानंतर जेईई मेन आणि नीट परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या दोन्ही परीक्षा आता सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आल्या आहेत. मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एक ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
यासंदर्भात करण्यात आलेल्या ट्विटमध्ये पोखरियाल यांनी म्हटले आहे, ''विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण लक्षात घेता, आम्ही JEE आणि NEET परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता JEE Main परीक्षा 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान, JEE अॅडवान्स्ड परीक्षा 27 सप्टेंबरला तर NEET परीक्षा 13 सप्टेंबरला घेतल्या जातील.''
Keeping in mind the safety of students and to ensure quality education we have decided to postpone #JEE & #NEET examinations. JEE Main examination will be held between 1st-6th Sept, JEE advanced exam will be held on 27th Sept & NEET examination will be held on 13th Sept. pic.twitter.com/klTjtBxvuw
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) July 3, 2020
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच चालला आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. रोज नव्या कोरोनाबाधितांचा विक्रमी आकडा समोर येत आहे. देशात लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर हजारो लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून नीट आणि जेईई मुख्य परीक्षा स्थगित करण्याची मागणी करत होते.
विद्यार्थ्यांची ही मागणी लक्षात घेत अखेर मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एक कमिटी स्थापन केली होती. या कमीटीने देशभरातील संपूर्ण स्थितीचा अभ्यास केला आणि आज नीट तसेच जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी JEE मुख्य परीक्षा 18 ते 23 जुलैदरम्यान होणार होती. तर नीट परीक्षा 26 जुलैला घेण्यात येणार होती.
महत्त्वाच्या बातम्या -
दिल जीत लिया... PM मोदी थेट सीमेवर, नेटिझन्सच्या आनंदाला 'सीमा'च उरली नाही!
लडाखच्या 'कुरुक्षेत्रावर' मोदी असं काही बोलले; जवानांमध्ये १२ हत्तींचे बळ संचारले!
चीनच्या ठोशाला ठोसा द्यायला भारत तयार, सर्जिकल स्ट्राइक करणारी स्पेशल फोर्स लडाखमध्ये तैनात
आता कुरापतखोर चीनचा थेट रशियावरच डोळा, या 'मोठ्या' शहरावर सांगितला दावा!
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!