शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर राष्ट्रवादीचा थाळीनाद रहदारीचा खोळंबा : युती सरकारच्या निष्क्रियतेबद्दल संताप

By admin | Updated: October 29, 2015 22:02 IST

जळगाव : शेतकरी व विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत, महागाई वेगात वाढत आहे. मात्र कुंभकर्णी झोप घेत असलेले सरकार अजूनही जागे होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी दुपारी थाळीनाद व हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर थाळीनाद करण्यात आला.

जळगाव : शेतकरी व विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत, महागाई वेगात वाढत आहे. मात्र कुंभकर्णी झोप घेत असलेले सरकार अजूनही जागे होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी दुपारी थाळीनाद व हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर थाळीनाद करण्यात आला.
रा.कॉ.कार्यालयापासून मोर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयापासून जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ.सतीश पाटील, खासदार ईश्वरलाल जैन, माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, ॲड.रवींद्र भैया पाटील, महानगराध्यक्ष परेश कोल्हे, महिला आघाडीच्या प्रदेश पदाधिकारी मंगला पाटील, कल्पना पाटील, मीनल पाटील, शहराध्यक्ष प्रतिभा पाटील, दीपाली पाटील, पं.स.सदस्या लताबाई पाटील, विशाल देवकर, वाल्मीक पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गावर दाखल झाले.
महामार्गावर थाळीनाद व घोषणाबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आकाशवाणी चौकात येत राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. या ठिकाणी थाळीनाद करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. मोदी सरकार हाय...हाय.., खंडणी सरकार हाय...हाय, एक वर्षात केले काय...खाली डोके वर पाय... अशी घोषणाबाजी सुरू केली.
महामार्गावर रहदारीचा खोळंबा
आंदोलकांनी जवळपास १५ ते २० मिनीटे राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजूच्या रहदारीचा खोळंबा झाला. या ठिकाणी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युती सरकारच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. २० मिनीटानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. प्रवेशद्वार बंद असल्याने या ठिकाणी रस्त्यावर आंदोलक एकत्र आले. या ठिकाणी पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली.
केंद्र व राज्य शासनावर उगारला आसूड
आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले. या ठिकाणी पुन्हा थाळीनाद व ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी यांच्या दालनाच्या दिशेने वळविला. कार्यालयाच्या समोर बराच वेळ आंदोलक उभे होते.
जिल्हाधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर आंदोलन
जिल्हाधिकारी या दालनात नसल्याची माहिती आंदोलकांना मिळाली. त्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी थेट दालनात प्रवेश केला. आंदोलकांनी जिल्हाधिकार्‍यांना तत्काळ बोलविण्याची मागणी केली. मात्र दहा मिनीटे जिल्हाधिकारी दालनात न आल्याने महिला पदाधिकार्‍यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर थाळीनाद आंदोलन सुरू केले. यावेळी शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी महिलांनी सुरू केली.