शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

Navjot Singh Sidhu: नवज्योत सिंग सिद्धूंना सुप्रीम कोर्टाचा दणका, 34 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात 1 वर्षाचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 2:19 PM

Navjot Singh Sidhu road rage case: 27 डिसेंबर 1988 मध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मारहाणीत एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

Navjot Singh Sidhu road rage case: काँग्रेसचे पंजाबमधील नेते आणि माजी भारतीय क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 34 वर्षांपूर्वी सिद्धू आणि त्यांच्या एका मित्राने केलेल्या मारहाणीत गुरनाम सिंगच्या नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. 

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या 34 वर्षे जुन्या रोडरेज केसमध्ये सर्वोच्च न्यायालयने आज निर्णय दिला. यापूर्वी पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाने सिद्धूंना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता. तर सर्वोच्च न्यायालयाने सिद्दूला या आरोपांतून मुक्त केले होते, तसेच मारहाण प्रकरणी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. पण, आता त्यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नेमकी काय घटना आहे?27 डिसेंबर 1988 मध्ये ही घटना घडली होती. सिद्धूने पटियालामध्ये रस्त्याच्या मधोमध जिप्सी पार्क केली होती. या मार्गावरून मृत 65 वर्षीय व्यक्ती आणि अन्य दोघे बँकेत पैसे काढण्यासाठी जात होते. यावेळी त्यांनी सिद्धूला गाडी बाजुला घेण्यास सांगितले. यातून वाद झाला आणि सिद्धू आणि त्याच्या सहकाऱ्याने मारहाण केली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोप केला होता की, सिद्धू हे मारहाण करून पसार झाले होते. 

सप्टेंबर 1999 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने नवजोत सिंग सिद्धूला निर्दोष सोडले होते. परंतू उच्च न्यायालयाने डिसेंबर 2006 मध्ये सिद्धू आणि अन्य एकाला दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याला सिद्धूने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मृताच्या नातेवाईकांनी रिव्हू पिटीशन दाखल केली होती. त्यावर निकाल देताना आज न्यायालयाने सिद्धूंना शिक्षा सुनावली आहे.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय