नवी दिल्ली - करोडो लोकांच्या हितासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. National Pension System चे नियम बदलले आहेत. NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम हा एक बचतीसाठीचा लोकप्रिय पर्याय आहे. 1 मे 2009 पासून खासगी क्षेत्रातील किंवा असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचार्‍यांसाठी सुद्धा ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या योजनेत 2 कोटी ग्राहक जोडले गेले आहेत. ही एक पेन्शन बचत योजना असून भविष्यात आर्थिक सुरक्षा देते. एनपीएसद्वारे आपण 60 हजार रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी कशा प्रकारे प्लॅनिंग करू शकता असा एक प्रश्न आहे. मात्र  यासंदर्भात एका मोठ्या नियमात सरकारने बदल केला आहे.

एनपीएसचा बदलला नियम 
 
नॅशनल पेन्शन सिस्टमचे जुने सब्सक्रायबर्स म्हणजेच ज्यांनी वेळेपूर्वी ही योजना सोडली आहे ते पुन्हा यामध्ये सामील होऊ शकतात. पीएफआरडीएने यासाठी परवानगी दिली आहे. नियमांनुसार, ग्राहक वयाची 60 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच यातून बाहेर पडू शकतात. जेव्हा एनपीएसमधील गुंतवणूक मॅच्यूअर होते, तेव्हा गुंतवणूकदारास नियमित पेन्शनच्या स्वरूपात 80% रक्कम मिळते, तर उर्वरित 20% रक्कम एकरकमी काढून घेता येते. आता ज्यांनी 20 टक्के पैसे काढले आहेत आणि त्यांना पुन्हा एनपीएसमध्ये जोडले जायचे असेल तर त्यांना ही रक्कम जमा करावी लागेल. या व्यतिरिक्त ते नियमित पेन्शन घेऊन विड्रॉल पेन्शन प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यानंतर, ते नवीन एनपीएस खाते उघडू शकतात.

NPS: प्रीमॅच्यूअर एक्झिटच्या नियमांमध्ये बदल

पीएफआरडीएने या ग्राहकांना नॅशनल पेन्शन सिस्टमचा पर्याय दिला आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम आपल्या ग्राहकांना निवृत्तीसाठी कमी किंमतीवरील पेन्शन फंडच्या माध्यमातून एक संधी देते. एनपीएसच्या फायद्यातील फीचर्समध्ये पोर्टेबिलिटी, लवचिकता, योगदानाचे वाटप करण्याचे विविध सोप्या मार्ग, पेन्शन फंडाच्या पर्यायाचा समावेश आहे. 

PRAN म्हणजे काय?, आता पुढे काय होणार? 

एनपीएस अंतर्गत सब्सक्रायबर्सना परमनेंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर (PRAN) दिला जातो. जो यूनिक असतो. सब्सक्रायबर्सकडे एकावेळी एक सक्रीय PRAN असू शकतो. त्यामुळे ते सध्याचे एनपीएस खाते बंद केल्यानंतरच नवीन खाते उघडू शकतात. प्रीमॅच्यूअर एक्झिटच्या परिस्थितीत PRAN मध्ये जमा असणाऱ्या फंडपैकी 20 टक्के पर्यंतची रक्कम एकरकमी काढता येते. उर्वरित 80 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम PFRDA द्वारे अ‍ॅन्युइटी सर्व्हिस प्रोव्हाईडर (एएसपी) कडून Annuity योजना खरेदी करण्यासाठी वापरतील. 

यासाठी काय करावे लागले?

नवीन PRAN सह नवीन एनपीएस खाते उघडा. एनपीएस त्याच PRAN सुरू ठेवण्यासाठी प्रथम काढलेली रक्कम (20 टक्क्यांपर्यंत) आपल्या एनपीएस खात्यात (PRAN) जमा करा. सध्याचे PRAN सुरू ठेवण्यासाठी, पुन्हा डिपॉझिट करण्याचा पर्याय एकदा मिळू शकेल आणि एकरकमी रक्कम जमा करावी लागेल. 18 ते 60 वयोगटातील कोणताही पगारदार व्यक्ती एनपीएसमध्ये सामील होऊ शकेल. एनपीएसमध्ये दोन प्रकारची खाती आहेत.Tier-I आणि Tier-II. टियर -I एक सेवानिवृत्ती खाते आहे, जे प्रत्येक सरकारी कर्मचार्‍यास उघडणे अनिवार्य आहे. तर Tier-II एक स्वयंसेवी खाते आहे, ज्यामध्ये कोणताही पगारदार व्यक्ती त्याच्या वतीने गुंतवणूक सुरू करू शकते आणि कोणत्याही वेळी पैसे काढू शकते.

कशी मिळेल महिन्याला 60 हजार रुपये पेन्शन? 

जर 25 वर्षांच्या वयामध्ये या योजनेत सामील होत असाल तर 60 वर्षे वयाच्या म्हणजेच 35 वर्षापर्यंत तुम्हाला योजने अंतर्गत दरमहा 5000 रुपये जमा करावे लागतील. तुमची एकूण गुंतवणूक 21 लाख रुपये असेल. जर एनपीएसमधील एकूण गुंतवणुकीचा अंदाजित परतावा 8 टक्के असेल तर एकूण कॉर्पस 1.15 कोटी रुपये असेल. यापैकी 80 टक्के रकमेसह जर तुम्ही Annuity खरेदी केली तर ते मूल्य जवळपास 93 लाख रुपये असेल. Annuity रेट 8 टक्के असल्यास वयाच्या 60 व्या वर्षानंतर नंतर दरमहा 61 हजार रुपये पेन्शन मिळेल. तसेच 23 लाख रुपयांचा वेगळा निधीही मिळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय"

"भारतीय हवाई दलात पाकिस्तान आणि चीनला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद"

CoronaVirus News : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ, कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी! 

"कांद्याच्या निर्यात बंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, सरकार ऐकत का नाही?", शिवसेनेचा हल्लाबोल

भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल 

English summary :
national pension scheme nps features advantages national pension scheme new rules what is nps account and its benefits

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: national pension scheme nps features advantages national pension scheme new rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.