indian airforce cofiden of taking on both china and pakistan fronts | "भारतीय हवाई दलात पाकिस्तान आणि चीनला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद"

"भारतीय हवाई दलात पाकिस्तान आणि चीनला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद"

नवी दिल्ली -  पाकिस्तान आणि चीन एकाच वेळी भारताविरूद्ध मोर्चेबांधणी करू शकतात अशी शंका सध्या व्यक्त केली जात आहे. मात्र अशा परिस्थितीसाठी भारतीय हवाई दल तयार असून सज्ज झालं आहे. भारतीय हवाई दलाच्या जवानांनी या दोघांशीही एकाचवेळी लढण्यास आम्ही सक्षम आहोत असं म्हटलं आहे. 

फॉरवर्ड एअरबेस हे एक ठिकाण असून पाकिस्तान इथून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर आहे. तर भारतासाठी सामरिक दृष्टीकोनातून महत्त्वाचे असलेले दौलत बेग ओल्डी (DBO) हे लडाखमध्ये असलेले ठिकाण 80 किलोमीटर दूर आहे. या ठिकाणी दिवसरात्र लढाऊ, मालवाहून विमानं आणि हेलिकॉप्टर्स उड्डाण घेतात. यामध्ये सुखोई एमकेआय 30, सी -130 जे, सुपर हरक्यूलिस, इलुशिन 76 आणि अँटोन 32 यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

LAC वर पुरवली जातेय रसद आणि दारुगोळा 

चीनशी सुरू असलेल्या तणाव लक्षात घेता दिवसरात्र विमानांची उड्डाणं सुरू आहेत. मालवाहू विमानं ही  रेशन, दारूगोळा घेऊन सतत उड्डाणं करत आहेत. ही विमानं पूर्व लडाखच्या डीबीओसह प्रत्यक्ष ताबा रेषेवरील लष्करी तळांवर सामान घेऊन जात आहेत. पाकिस्तान आणि चीन एकत्र येण्याची शक्यता पाहता पाकिस्तानच्या स्कार्दू एअरबेसचा भारताला धोका आहे का? असा प्रश्न विचारला गेला. त्याला हवाई दलाच्या लेफ्टनंट रँकवरील अधिकाऱ्याने उत्तर दिलं आहे. 

''गौरव से आसमान छू लो' या हवाई दलाच्या घोषवाक्यानुसार आम्ही पूर्णपणे तयार'

"भारतीय हवाई दल आधुनिक सुविधांमुळे पूर्णपणे तयार आहे आणि दोन्ही मोर्चांवर कोणतीही कारवाई करू शकतो. 'गौरव से आसमान छू लो' या हवाई दलाच्या घोषवाक्यानुसार आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि आमच्यात जोशही आहे" असं अधिकाऱ्याने म्हटलं आहे. हवाई दलाच्या नाईट ऑपरेशनबाबत एका फायटर पायलटने दिलेल्या माहितीनुसार, "आपल्या लढाऊ क्षमतांचा मोठा विकास झाला आहे. आता आम्ही फॉरवर्ड बेसवरून रात्री सर्व प्रकारच्या मोहीमा पूर्ण करू शकतो." 

गलवानमध्ये 'इतके' सैनिक झाले ठार; चीनने पहिल्यांदाच दिली कबुली

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय जवानांबरोबर 15 जून रोजी झालेल्या संघर्षात चिनी सैनिक मारले गेले होते, अशी कबुली चीनने दिली आहे. मात्र, या संघर्षात ठार झालेल्या चिनी सैनिकांची संख्या भारतीय जवानांहून कमी आहे, असा दावा चीनने काही दिवसांपूर्वी केला आहे. भारत आणि चीनमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आता पहिल्यांदाच चीनने गलवान खोऱ्यातील संघर्षात आपले सैनिक ठार झाल्याचं मान्य केलं असून आकडा सांगितला आहे. 

पाच चिनी सैन्यांमध्ये चीनच्या एका कमांडिंग ऑफिसरचाही समावेश

गलवान खोऱ्यातील 15 संघर्षात चीनचे पाच सैन्य ठार झाले असल्याची बाब चीनने मान्य केली आहे. 'द हिंदू'ने याबाबतचे वृत्त दिलं आहे. भारताच्या प्रत्युत्तरात ठार झालेल्या पाच चिनी सैन्यांमध्ये चीनच्या एका कमांडिंग ऑफिसरचाही समावेश आहे. याआधी चीनने फक्त एकच सैनिक ठार झाला असल्याचं मान्य केलं होतं. चीनकडून फक्त पाच सैनिक ठार झाले असल्याचा दावा करण्यात येत असला तरी भारतीय आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या दाव्यानुसार, 40 चिनी सैन्य ठार झाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ, कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी! 

"कांद्याच्या निर्यात बंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, सरकार ऐकत का नाही?", शिवसेनेचा हल्लाबोल

भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल 

Bharat Bandh : "ना मोबदला, ना सन्मान; नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार"

Bihar Election 2020 : एका बूथवर 1000 मतदार, वेळेची मर्यादा वाढवली; कोरोनाग्रस्तांनाही करता येणार मतदान

English summary :
indian airforce cofiden of taking on both china and pakistan fronts

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: indian airforce cofiden of taking on both china and pakistan fronts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.