Bihar Election 2020 : एका बूथवर 1000 मतदार, वेळेची मर्यादा वाढवली; कोरोनाग्रस्तांनाही करता येणार मतदान

By सायली शिर्के | Published: September 25, 2020 01:28 PM2020-09-25T13:28:24+5:302020-09-25T13:52:45+5:30

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा असून जदयू, भाजपामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविताना रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

bihar elections 2020 dates election commission press conferences | Bihar Election 2020 : एका बूथवर 1000 मतदार, वेळेची मर्यादा वाढवली; कोरोनाग्रस्तांनाही करता येणार मतदान

Bihar Election 2020 : एका बूथवर 1000 मतदार, वेळेची मर्यादा वाढवली; कोरोनाग्रस्तांनाही करता येणार मतदान

googlenewsNext

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीचे आज बिगूल वाजणार आहे. निवडणूक आयोगाने दुपारी 12.30 वाजता एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं असून या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची थोड्याच वेळात घोषणा होऊ शकते. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा संबोधित करीत आहेत. विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तारखा घोषित होणार आहेत. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे.

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा असून जदयू, भाजपामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविताना रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. "कोरोनाचे संकट असल्याने जगातील 70 देशांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. बिहारमधील ही निवडणूक कोरोना काळातील सर्वात मोठी निवडणूक आहे. कोरोना काळातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगानं यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या दृष्टीनं मतदान केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे" अशी माहिती सुनील अरोरा यांनी दिली आहे. 

मतदानासाठी आणखी एक तासाचा कालावधी

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनामुळे नवीन सुरक्षा नियमांनुसार निवडणुका घेण्यात येतील. मतदान केंद्रावर मतदारांची संख्या कमी असेल. एका बूथवर एक हजार मतदार असतील. तसेच यावेळी बिहार निवडणुकीत एक लाखांहून अधिक मतदान केंद्रे असतील.  यावेळी मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे. बिहार निवडणुकीत मतदानासाठी आणखी एक तासाचा कालावधी ठेवण्यात आला आहे. म्हणजेच सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होईल. मात्र नक्षलग्रस्त भागात असं होणार नाही. तसेच शेवटच्या तासात कोरोनाचे रुग्ण मतदान करू शकतील"

6 लाख पीपीई किट, 46 लाखांहून अधिक मास्क आणि सॅनिटायझर्स

"कोरोनाच्या संकटात राज्य निवडणूक आयोगाला 6 लाख पीपीई किट देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त, निवडणुकीत 46 लाखांहून अधिक मास्क आणि सॅनिटायझर्सचा वापर केला जाणार आहे. पक्ष आणि उमेदवारांना व्हर्च्युअल निवडणूक प्रचार करावा लागणार आहे. कोरोनामुळे मोठ्या जाहीर सभा घेतल्या जाणार नाहीत. तसे उमेदवारीसाठी दोनपेक्षा जास्त वाहने कोणत्याही उमेदवारासह येऊ शकत नाहीत" अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

गलवानमध्ये 'इतके' सैनिक झाले ठार; चीनने पहिल्यांदाच दिली कबुली

Bharat Bandh Live Updates : "सरकारने अन्नदाता शेतकऱ्यांना कळसुत्री बाहुली केलं", तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल

"आम्ही आधी हात जोडत होतो, पण आता आपण दिल्ली हादरवू", हरसिमरत कौर यांचा इशारा

दिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता

Read in English

Web Title: bihar elections 2020 dates election commission press conferences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.