bharat bandh live updates farmers nationwide protest against farm bill 2020 | Bharat Bandh Live Updates : शेतकऱ्यांना ना मोबदला, ना सन्मान; आपल्याच शेतात कामगार - प्रियंका गांधी

Bharat Bandh Live Updates : शेतकऱ्यांना ना मोबदला, ना सन्मान; आपल्याच शेतात कामगार - प्रियंका गांधी

नवी दिल्ली - केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून आवाड उठवला जात आहे. संसदेत या कृषी विधेयकांना विरोधकांनी आणि सत्ताधारी एनडीएमधील काही  घटक पक्षांनी विरोध दर्शविला. तरीही ही कृषी विधेयके मंजूर करण्यात आली. त्यामुळे देशभरातील शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली तरीही त्यातून शेतकरी हित साधले जाणार नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आज 'भारत बंद 'ची हाक दिली आहे. या बंदमध्ये देशभरातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकरी सहभागी झाले आहेत.
 

LIVE

Get Latest Updates

05:16 PM

बिहार - गया येथे नवीन कृषी सुधारणा विधेयकाविरोधात विरोधी पक्षांनी नोंदविला निषेध

03:51 PM

Bharat Bandh : "ना मोबदला, ना सन्मान; नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार"

03:16 PM

शेतकरी आपल्याच शेतात कामगार होईल - प्रियंका गांधी


 

02:27 PM

नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार - राहुल गांधी

12:56 PM

तामिळनाडूमध्ये नॅशनल साऊथ इंडियन रिव्हर इंटरलिंकिंग फार्मर्स असोसिएशनच्या शेतकऱ्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन


 

12:53 PM

भारतीय किसान युनियनच्या सदस्यांनी नोएडामध्ये रास्ता रोको


 

12:50 PM

12:43 PM

शेतकरी विरोधी विधेयकाचा कराडमध्ये निषेध

12:16 PM

Bharat Bandh: तेजस्वी यादवांची ट्रॅक्टर रॅली; म्हणाले, 'सरकारने आमच्या अन्नदात्याला कठपुतली बनवले'

12:16 PM

सातारा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कराड तहसीलदार कार्यालयासमोर शेतकरी विरोधी विधेयकाचा विधेयक फाडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
 

11:47 AM

शेतकऱ्यांच्या रॅलीत तेज प्रताप यादव सहभागी

11:15 AM

तेजस्वी यादव ट्रॅक्टरवर स्वार होऊन रॅलीत सहभागी


 

11:06 AM

सरकारने अन्नदाता शेतकऱ्यांना कळसुत्री बाहुली केलं - तेजस्वी यादव

11:01 AM

दिल्लीमध्ये पोलीस बंदोबस्त


 

10:39 AM


 

10:28 AM

नाशिक - केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे शेतात केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जमिनीत गाडून आंदोलन केले.
 

10:19 AM

नाशिकमध्ये आंदोलनाला सुरुवात

10:14 AM

"आम्ही आधी हात जोडत होतो, पण आता आपण दिल्ली हादरवू", हरसिमरत कौर यांचा इशारा


 

10:03 AM

 केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना आमचा विरोध आहे आणि आता अकाली दल या लढ्यात शेतकऱ्यांसोबत आहे - हरसिमरत कौर

10:00 AM

कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर

09:58 AM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनेही शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

09:56 AM

केंद्र सरकारच्या या कृतीचा किसान सभेच्यावतीने धिक्कार असून शेतकरी संघटनांच्या देशव्यापी मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने या विधेयकांविरोधात आज देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे - डॉ. अजित नवले 

09:53 AM

बंद दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन करा, कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करा - पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग

09:49 AM

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समिती आक्रमक झाली असून आज सकाळपासून अमृतसरमध्ये  रेल रोको आंदोलन सुरू केले आहे.
 

09:48 AM

अमृतसरमध्ये रेल रोको आंदोलन सुरू


 

09:47 AM

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आज 'भारत बंद 'ची दिली हाक, या बंदमध्ये देशभरातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकरी सहभागी

English summary :
bharat bandh live updates farmers nationwide protest against farm bill 2020

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bharat bandh live updates farmers nationwide protest against farm bill 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.