शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

नरसीत शोरुम फोडून दोन दूचाकी पळविल्या पोलिसांची निष्क्रियता: चोर्‍यांचे सत्र सुरुच

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

नरसी फाटा/शंकरनगर: नरसीत चोर्‍यांचे सत्र सुरुच असून गुरुवारी रात्री चोरट्यांनी हिरो कंपनीचे शोरुम फोडून दोन दूचाकीसह रोख दोन लाख रुपये चोरुन नेले़ पोलिसाचेच घर फोडून चोरट्यांनी पोलिस यंत्रणेसमोर आव्हान उभे केले आहे़

नरसी फाटा/शंकरनगर: नरसीत चोर्‍यांचे सत्र सुरुच असून गुरुवारी रात्री चोरट्यांनी हिरो कंपनीचे शोरुम फोडून दोन दूचाकीसह रोख दोन लाख रुपये चोरुन नेले़ पोलिसाचेच घर फोडून चोरट्यांनी पोलिस यंत्रणेसमोर आव्हान उभे केले आहे़
देगलूर मार्गावर मुख्य रस्त्यालगत गोविंदराज मोटर्स हिरो कंपनीचे शोरुम आहे़ शोरुमच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला़ गल्यात ठेवलेले रोख दोन लाख रुपये व दोन दूचाकी चोरुन नेल्या़ २० रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली़ दरम्यान, दोन दिवसापूर्वीच नरसीत एका शिक्षकाचे घर फोडून रोख रक्कमेसह घरातील साहित्य चोरुन नेले होते़ पोलिस यंत्रणा कुचकामी ठरल्याचे लक्षात येताचा चोरट्यांनी मनसुबे आणखी पक्के करत दस्तूरखुद्द एका पोलिसाच्या घरावरही डल्ला मारला़
राज्य महामार्ग असल्याने नरसी चौकात दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते़ चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी रात्रीच्यावेळी गस्त घालण्यात येते़ मात्र ही गस्त कागदोपत्रीच सुरु असल्याने चोरट्यांना रान मोकळे झाले आहे़ गस्तीपथकातील कर्मचारी गस्त घालण्याऐवजी रात्री जाणारी वाहने अडवून एंन्ट्री वसूल करण्यात मग्न असल्याची वस्तूस्थिती समोर आली आहे़
रामतीर्थ ठाण्यात अधिकारी, कर्मचार्‍यांतील बेबनाव नवीन नाही़ मात्र याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे़ दोन दिवसापूर्वी झालेल्या चोरीचा सुगावा पोलिसांना अद्याप लागला नाही़ चोरीच्या घटना वाढल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे़ दरम्यान, चोरी झालेल्या दूचाकी शोरुमला उपविभागीय पोलिस अधिकारी अमोघ गावकर यांनी शुक्रवारी सकाळी भेट दिली़ चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेता त्यांनी गस्तीवरील अधिकारी, कर्मचार्‍यांची झाडाझडती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली़
शोरुम फोडल्याप्रकरणी प्रशांत चिंतावार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामतीर्थ ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़