शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी लवकरच इस्रायलला भेट देणार

By admin | Updated: March 5, 2016 03:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी लवकरच इस्त्राएलला भेट देणार आहेत, अशी माहिती इस्त्राएलचे भारताताली वाणिज्य दूत डेविड अकोव यांनी शुक्रवारी लोकमतला दिली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी लवकरच इस्त्राएलला भेट देणार आहेत, अशी माहिती इस्त्राएलचे भारताताली वाणिज्य दूत डेविड अकोव यांनी शुक्रवारी लोकमतला दिली. गेल्या वर्षी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्त्राएलला भेट दिली होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे दोन देशांतील संबंध सुधारण्यास मदत होत आहे. नरेंद्र मोदी हे इस्त्राएलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असतील. त्यांच्या भेटीबाबत सध्या बोलणी सुरू आहेत.डेविड ओकोव आणि उपवाणिज्य दूत निमरोद असुलिन यांनी शुक्रवारी लोकमच्या मुंबई कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी बोलताना ओकोव यांनी कृषीपासून सुरक्षेपर्यंत अनेक क्षेत्रांत भारत आणि इस्त्राएल यांच्यात सहकार्य होणे शक्य असून,गेल्या काही वर्षांमध्ये त्या दृष्टीने सकारात्मक पावले पडत असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी भारत-इस्त्राएल संबंध आणि महाराष्ट्र-इस्त्राएल सहकार्य याविषयी सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले की, तंत्रज्ञानात आमचा देश आघाडीवर असून, उत्पादन क्षेत्रातील कोणत्याही बड्या कंपनीशी विशिष्ट समस्येबाबत तोडगा काढण्यासाठी या तंत्रज्ञानाचा निश्चितच उपयोग होईल. कृषी, वाहननिर्मिती अशा अनेक क्षेत्रात येत्या काही वर्षांत दोन देशांतील कंपन्यांमध्ये आपणास सहकार्य पाहायला मिळू शकेल. भारतासारख्या देशाशी चांगले संबंध असणे इस्त्राएलला आवश्यक वाटत आहे, असे सांगताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील चांगल्या बदलांचा आणि आर्थिक विकास दराच्या वाढीचा आवर्जून उल्लेख केला.