शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

आज निवडणुका झाल्यास देशात मोदींचीच सत्ता, पण महाराष्ट्रात भाजपाला बसणार धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 8:22 AM

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने स्वबळावर 300 हून अधिक जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. 

नवी दिल्ली - 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने स्वबळावर 300 हून अधिक जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती.  गेल्या वर्षभरात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक निर्णघ घेतले असून, त्या निर्णयांबाबत उलटसुटल प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत. दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासारख्या कायद्यावरून देशात असंतोष असल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज देशात लोकसभेची निवडणूक झाल्यास देशात पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचीच सत्ता येईल, असा अंदाज एबीपी आणि सी-व्होटरच्या सर्व्हेने वर्तवला आहे. तर महाराष्ट्रात मात्र भाजपाला धक्का बसणार आहे. 

आजच्या घडीचा देशातील कल जाणून घेण्यासाठी एबीपी-सीव्होटरने लोकसभेच्या 543 मतदारसंघातील 30  हजार 240 लोकांशी चर्चा करून माहिती घेतली आहे. या सर्व्हेनुसार आज निवडणूक झाली तर मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला 330 जागा मिळतील. 2019 च्या तुलनेत आज निवडणूक झाल्यास एनडीएला 23 जागांचे नुकसान होणार आहे.  तर यूपीएला 130 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. 2019 च्या तुलनेत यूपीएला 34 जागांचा फायदा होताना दिसत आहे. तर इतर पक्षांना 83 जागा मिळणार आहेत. 

Mann Ki Baat: हिंसा कुठल्याही समस्येवरचा उपाय नाही - नरेंद्र मोदीRepublic Day 2020: प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडली ४८ वर्षाची 'ही' परंपराअर्थसंकल्पाआधी मोदी सरकारसाठी आणखी एक वाईट बातमी; देशाची चिंता वाढणार

या सर्व्हेमधून मोदी सरकारच्या कामगिरीविषयी विचारणा केली असता सुमारे 56 टक्के लोकांनी मोदींच्या कामगिरीवर खूप समाधानी असल्याचे सांगितले. तर 24 टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले. 20 टक्के लोकांनी मात्र मोदी सरकारच्या कामगिरीवर असमाधानी असल्याचे मत नोंदवले. 

देशात मोदींचीच हवा असली तरी  महाराष्ट्रात मात्र वेगळे चित्र दिसत आहे.  राज्यात अस्तिवात आलेल्या महाविकास आघाडीचा फटका भाजपाला बसणार आहे. त्यामुळे आज निवडणूक झाल्यासा भाजपाला केवळ 21 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर महाविकास आघाडी आणि इतर पक्षांना मिळून 27 जागा मिळतील. आज निवडणूक झाल्यास कुणाला किती जागा मिळतील? एनडीए - 330 जागायूपीए - 130इतर पक्ष 83  गेल्या काही काळात विविध राज्यांमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता देशात कायम आहे. देशातील बहुतांश लोकांची पंतप्रधानपदासाठी अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पसंती असल्याचे सर्व्हेमधून समोर आले आहे. या सर्व्हेनुसार सुमारे 70 टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती दिली आहे. तर 25 टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्या पारड्यात आपले मत टाकले आहे. तर 5 टक्के मतदारांनी दोघांपैकी एकालाही पसंती दिलेली नाही.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूकcongressकाँग्रेस