शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी विरोधकांना फटकारले; म्हणाले, विरोध करण्यासाठी खूप मुद्दे, विरोध झाला पाहिजे, पण....

By बाळकृष्ण परब | Updated: February 8, 2021 11:11 IST

Narendra Modi LIVE Updates: कोरोनाकाळात आपण अज्ञात शत्रूविरोधात लढत होतो. हा अज्ञात शत्रू काय करू शकतो याचा कुणाला अंदाज नव्हता. कुणी कुणाची मदत करू शकत नव्हते.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान आज राज्यसभेमध्ये संबोधन देत उत्तर दिले आहे. कोरोनाकाळ आणि शेतकरी आंदोलनादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यसभेमध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींनी कोरोनाकाळात केलेल्या विरोधावरून विरोधी पक्षांना फटकारले आहे.

मोदी राज्यसभेमधील आपल्या संबोधनात म्हणाले की, कोरोनाकाळात आपण अज्ञात शत्रूविरोधात लढत होतो. हा अज्ञात शत्रू काय करू शकतो याचा कुणाला अंदाज नव्हता. कुणी कुणाची मदत करू शकत नव्हते. अशा काळात आपण कोरोनाविरोधातील लढाई लढली. मात्र अशा परिस्थितीतही काही जणांकडून विरोध होत होता. कोरोनाकाळात एका वृद्ध आईने झोपडीबाहेर दिवा पेटवला. मात्र त्याचीही खिल्ली उडवली गेली. विरोध करण्यासाठी खूप मुद्दे आहेत. विरोध झाला पाहिजे. मात्र देशाचं मनोबल तोडणारा विरोध नको. देशाच्या मनोधैर्यावर, सामर्थ्यावर आघात करणारा विरोध नको, असा टोलाही मोदींनी विरोधकांना लगावला.

मोदी म्हणाले की, कोरोनाचे संकट आले तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतीत होते. जर भारत सावरला नाही तर जगाला संकट निर्माण होईल, असे म्हटले जात होते. तेव्हा भारताने आपल्या देशाच्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी एका अज्ञात शत्रूसोबत लढाई लढली. मात्र आज भारताने ही लढाई जिंकल्याने जग अभिमान बाळगत आहे. ही लढाई कुठले सरकार किंवा व्यक्तीने लढलेली नाही. मात्र याचं श्रेय भारताला जातं, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदcorona virusकोरोना वायरस बातम्या