Narendra Modi Birthday Rahul Gandhi Wishes PM Modi On 70th Birthday | Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी, कंगना राणौतने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी, कंगना राणौतने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (17 सप्टेंबर) आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाकडूनही वाढदिवसाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. यासोबतच अभिनेत्री कंगना राणौत, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि भाजपाच्या सर्व मंडळींनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर देखील HappyBirthdayPMModi , happybirthdaymodiji, HappyBirthdayNarendraModi, HappyBdayNaMo, NarendraModi, NarendraModiBirthday हे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये असून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. 

मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव

काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोना, लॉकडाऊन यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. ट्विटरवरून सातत्याने हल्लाबोल करत आहेत. मात्र आज राहुल गांधी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री कंगना राणौतने देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'सेवाव्रतीचा वाढदिवस सेवाकार्यानेच साजरा करा!' असं म्हणत खास व्हिडीओ शेअर केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपाचे जे.पी. नड्डा, गीता फोगाट यांच्यासह अनेक मान्यवरांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.महत्त्वाच्या बातम्या

भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा 'तिरंगा' अन्...

"केंद्र सरकार वादे आणि दावे करतंय पण कोरोना पुढे, देश मागे हेच 'वास्तव'; जनतेला सोसावे लागताहेत चटके"

ये दोस्ती हम नही छोडेंगे! 12 वर्षांनंतर जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक एकत्र 

Video - ...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! प्रवासी असलेली बोट उलटली; 7 जणांचा मृत्यू, 14 बेपत्ता

"कोरोनाच्या काळात मोदी सरकारचा 'खयाली पुलाव', संकटातील 'संधी'", राहुल गांधींचा हल्लाबोल 

English summary :
Narendra Modi Birthday Rahul Gandhi Wishes PM Modi On 70th Birthday

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Narendra Modi Birthday Rahul Gandhi Wishes PM Modi On 70th Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.