ncp Jitendra Awhad and shivsena Pratap Sarnaik together after 12 years in thane | ये दोस्ती हम नही छोडेंगे! 12 वर्षांनंतर जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक एकत्र 

ये दोस्ती हम नही छोडेंगे! 12 वर्षांनंतर जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक एकत्र 

ठाणे - एकेकाळचे खास मित्र आणि काही वर्षांपासूनचे राजकीय हाडवैरी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा मैत्रीची तार छेडली आहे. म्हाडाच्या माध्यमातून वर्तकनगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून याची घोषणा करण्यासाठी आव्हाड आणि सरनाईक एकत्र आले होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष सोडल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी  एवढया वर्षांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात हजेरी लावली. पोलिसांच्या कुटुंबीयांनी आम्हाला पुन्हा एकदा एकत्र आणले अशी भावनिक प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली असून ये दोस्ती हम नही छोडेंगे असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा एवढ्या वर्षांनी मैत्रीची तार छेडली आहे.

तब्बल बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ पूर्वी ठाण्यातील राजकारणात जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक म्हणजे ‘दो हंसो का जोडा’ म्हणून ओळखले जायचे. मात्र २००८ साली प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाच्या वादावरून राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिवसेनेचा रस्ता धरला आणि त्यामुळे आव्हाड आणि सरनाईक यांच्यातील मैत्री राजकारणामुळे दुभंगली गेली. मात्र आता तब्बल बारा वर्षानंतर पुन्हा एकदा वर्तक नगर मधील पोलीस वसाहतींच्या पुनर्निर्माण यांच्या निमित्ताने गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि ओवळा माजिवडा मतदार संघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे आज एकत्र पत्रकार परिषद घेत आहेत.

२००८ साली प्रताप सरनाईक यांच्या समता नगर मधील हॉटेलमध्ये ते राष्ट्रवादीतून बाहेर पडत असल्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि ती गोष्ट होण्यापूर्वी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड हे प्रताप सरनाईक यांची समजूत घालण्याकरता या पत्रकार परिषदेपूर्वी सरनाईक यांच्या हॉटेलमध्ये स्वतः आले होते. मात्र राष्ट्रवादीत राहिल्यास आपल्याला आमदार होणे शक्य नाही हे लक्षात आल्यामुळे प्रताप सरनाईक यांनी आव्हाड यांच्या मनधरणी नंतरही शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली. मात्र त्यामुळे आव्हाड आणि सरनाईक यांच्या काही दशकांच्या मैत्रीत खंड पडला. त्यामुळे त्यानंतर खाजगी कार्यक्रम वगळता कोणत्याही राजकीय व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक ते पुन्हा कधीही एकत्र आलेले दिसले नाहीत.

त्यानंतर प्रताप सरनाईक तब्बल दोन वेळा ओवळा माजिवडा यासारख्या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये सुदैवाने राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी विकास सरकार स्थापन केले. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे राज्याचे गृहनिर्माण खात्याचे मंत्रिपद आले आणि प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील वर्तक नगर येथील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नाला गती मिळाली. २०१४ सली राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर ही प्रताप सरनाईक हे वर्तक नगरमधील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी प्रयत्नशील होते. त्याबाबत कालच मंत्रालयात जितेंद्र आव्हाड आणि आमदार प्रताप सरनाईक आमदार यांच्या उपस्थितीत अंतिम मान्यता मिळाली. त्यामुळे बारा वर्षापूर्वी राजकारणामुळे विभक्त झालेल्या या दोघा मित्रांना पुन्हा एकदा वर्तक नगरमधील पोलीस वसाहतींच्या निमित्त्याने एकत्र पत्रकार परिषद घेण्याची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे ठाण्याच्या राजकारणात पूर्वी ओळखला जाणारा हा ‘दो हंसो का जोडा’ पुन्हा एकदा मनोमिलन करत एकत्र येणार का याची उत्सुकता ठाणेकरांना लागून राहिली आहे.

सरनाईक हे गेले 8 वर्षांपासून पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा करत असून त्यांच्या या पाठपुराव्याला माझ्या सहीने पूर्ण विराम मिळाला असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. म्हाडाच्या माध्यमातून तब्बल 1600 घरे बांधण्यात येणार असून यातील 567 घरे पोलिसांना देण्यात येणार आहेत.तर 10 टक्के घरे हे शासकीय कर्मचाऱ्यांना रखीव ठेवण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी संगीतले.तर राज्यात महाविकास आघाडी प्रमाणे ठाण्यातही पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण  मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मी एकत्र काम करत असून पोलिसांच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा आम्हाला एकत्र आणले असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Video - ...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! प्रवासी असलेली बोट उलटली; 7 जणांचा मृत्यू, 14 बेपत्ता

"कोरोनाच्या काळात मोदी सरकारचा 'खयाली पुलाव', संकटातील 'संधी'", राहुल गांधींचा हल्लाबोल 

CoronaVirus News : भय इथले संपत नाही! कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा लागण, रिसर्चमधून धोक्याचा इशारा

CoronaVirus News : 1 ऑक्टोबरपासून देशभरात चित्रपटगृह सुरू होणार?, जाणून घ्या 'त्या' मागचं सत्य

"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"

English summary :
ncp Jitendra Awhad and shivsena Pratap Sarnaik together after 12 years in thane

Web Title: ncp Jitendra Awhad and shivsena Pratap Sarnaik together after 12 years in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.