शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

(निनाद) अवजड वाहनांमुळे पोखरी घाट धोकादायक

By admin | Updated: February 2, 2015 23:52 IST

अपघात वाढले : रस्ता रुंदीकरणाची नागरिकांची मागणी

अपघात वाढले : रस्ता रुंदीकरणाची नागरिकांची मागणी
डिंभे : मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटातील अवघड वळणांमुळे या रस्त्यावरील वाहतूक दिवसेंदिवस अवघड होत चालली आहे. डिंभे-भीमाशंकर या रस्त्यावरील अवघड वळणे काढून रस्तारुंदी करणाची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्यातून श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाण्यासाठी मंचर ते भीमाशंकर हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरील मंचर ते डिंभे हे अंतर सपाटीचे असले, तरी डिंभ्यापासून पुढे घाट रस्ता सुरू होतो. येथून पुढील रस्ता अरुंद व अवघड वळणांचा आहे. पोखरी घाटात तर अनेक वळणांवर या रस्त्यावरून जेमतेम एक गाडी जाईल, अशी परिस्थिती आहे. या वळणांवरून समोरून आलेले वाहन दिसत नसल्याने अनेकदा या ठिकाणी अपघात झाले आहेत. अवघड वळणे व अरुंद रस्ता यामुळे येथील वाहतूक धोकादायक झाली आहे.
पोखरी घाट संपल्यानंतर पुढील रस्ता अतिशय अवघड वळणांचा बनला आहे. पोखरी गावच्या पुढील सेंद्र्याचे लवण हे तर या रस्त्यावरील अपघात प्रवणक्षेत्र बनले आहे. दिवसाआड येथे दुचाकी चारचाकी गाड्यांचे अपघात ठरलेले असतात. मागील आठवड्यात या वळणावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या वळणाबाबत या पूर्वीही अनेकदा वर्तमानपत्रातून वृत्त प्रसिद्ध झाली आहेत. मात्र, अजूनही रस्त्याच्या रुंदीकरणाला मुहूर्त मिळालेला नाही. या मार्गावर तळेघर, राजपूर, निगडाळे ते भीमाशंकरपर्यंत अनेक अवघड वळणांमुळे आंबेगाव तालुक्यातून भीमाशंकरकडे जाणारा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे.
चौकट
भीमाशंकरकडे जाण्यासाठी खेडमार्गेही दुसरा मार्ग आहे. परंतु हा रस्ता अतिशय अवघड व अरुंद आहे. मंदोशी घाटातील वळणे व उतार हा वाहतुकीसाठी धोकादायक आहे. शिवाय हा रस्ता पुढे तळेघरला मिळत असल्याने बहुतांश प्रवासी मंचर-भीमाशंकर याच मार्गाचा उपयोग करतात. पोखरी घाट वगळता आंबेगाव तालुक्यातून भीमाशंकरकडे जाणारा हा मार्ग एका अर्थाने सुखकरच आहे. या मार्गावरील अवघड वळणे काढून रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी या भागातील प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
सोबत-फोटो,१ फेब्रुवारी २०१५ डिंभे,पी१
ओळी- पोखरी घाटातील अवघड वळणांमुळे मंचर-भीमाशंकर रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक होत आहे. या रस्त्यावरील अवघड वळणे काढून रस्त्याची रुंदी वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.
छायाचित्र-कांताराम भवारी.