शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

३३ हजार मतदारांची नावे वगळली

By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST

१२ जुलै रोजी मतदार यादी शुद्धीकरण मोहीम

१२ जुलै रोजी मतदार यादी शुद्धीकरण मोहीम
सोलापूर: विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये असलेल्या मतदारांपैकी ३३ हजार ७८१ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत़ २ लाख ५२ हजार मतदार ओळखपत्राचे आधारकार्डशी जोडणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली आहे़ येत्या रविवारी पुन्हा मतदार यादी शुद्धीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे़
निवडणूक आयोगाने मतदार याद्या चुका दुरुस्त करण्यासाठी ३१ जुलै २०१५ पर्यंत मतदार याद्या शुद्धीकरण अद्ययावतीकरण कार्यक्रम आयोजित केला आहे़ नागरिकांना शासनाच्या सर्व सोयीसुविधा मिळण्याकरिता प्रॉपर्टी कार्ड, रेशन कार्ड, गॅस अनुदान, बँक सबसिडी, संजय गांधी लाभार्थी अनुदान असे शासनाचे विविध लाभ घेण्यासाठी मतदान ओळखपत्र व आधार ओळखपत्र या कागदपत्रांची सांगड घालण्याची आवश्यकता असते़ त्याकरिता एकत्रित विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे़ त्या अनुषंगाने जिल्‘ातील सर्व तलाठी कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत कार्यालय, वॉर्ड कार्यालय तसेच केंद्राच्या ठिकाणी १२ जुलै २०१५ रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे़ या मोहिमेत मतदार ओळखपत्र व आधार कार्ड संगणकाद्वारे जोडण्याची कार्यवाही हाती घेतली जाणार आहे़ त्यामुळे १२ जुलै रोजी होणार्‍या मतदार यादी शुद्धीकरणाच्या मोहिमेत नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे़