नागपंचमीची पारंपरिक ग्रामसभा खेळीमेळीत

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:34+5:302015-08-19T22:27:34+5:30

ओतूर : जुन्नर तालुक्यात नागपंचमीच्या दिवशी ग्रामविकासासाठी पारंपरिक ग्रामसभा आयोजित केल्या जातात. शेकडो वर्षांची परंपरा या तालुक्यात आहे. त्या परंपरेनुसार श्रीक्षेत्र ओतूर येथे ही नागपंचमीची ग्रामसभा आयोजित केली होती. ही ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली.

Nagpanchami's traditional Gram Sabha debate | नागपंचमीची पारंपरिक ग्रामसभा खेळीमेळीत

नागपंचमीची पारंपरिक ग्रामसभा खेळीमेळीत

ूर : जुन्नर तालुक्यात नागपंचमीच्या दिवशी ग्रामविकासासाठी पारंपरिक ग्रामसभा आयोजित केल्या जातात. शेकडो वर्षांची परंपरा या तालुक्यात आहे. त्या परंपरेनुसार श्रीक्षेत्र ओतूर येथे ही नागपंचमीची ग्रामसभा आयोजित केली होती. ही ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी रघुनाथ गेनभाऊ तांबे हे होते.
या सभेसाठी श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, सचिव वसंत पानसरे, जी. आर. डुंबरे, संभाजी तांबे, वैभव तांबे, गोविंदराव तांबे, उपसरपंच बाळासाहेब घुले, माजी उपसरपंच धनंजय डुंबरे, गंगाराम डुंबरे, प्रभाकर तांबे, माधवराव डंुबरे, माजी पं. स. सदस्य रामदास तांबे, माजी सरपंच दत्तात्रय रोंगटे, विश्वासराव डुंबरे, विश्वास तांबे, पांडू वाकर, बबनराव गाढवे उपस्थित होते.
संजय डुंबरे यांनी गेल्या वर्षीच्या नागपंचमीच्या सभेचा वृत्तांत सादर केला. त्याला सर्वानुमते मंजुरी दिली.
या सभेत सांडपाणी, दररोजचा भाजी बाजार, नगरवेस रंगरंगोटी, संत तुकाराम मंदिर जीणार्ेद्धार या प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
संत तुकाराममहाराज मंदिराच्या जीणार्ेद्धारासाठी श्री गजाननमहाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व पुणे मनपाचे नगरसेवक विलास तांबे व खासदार सुप्रियाताई सुळे यांचा जीणार्ेद्धार व मंदिरासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे काम सुरू केले जाईल, असे वैभव तांबे यांनी जाहीर केले.
शेळ्या-मेंढ्याच्या रानाचा लिलाव १ लाख ५१ हजार रुपयांवर प्रकाश शांताराम तांबे यांनी व गुरव ठेका रानाचा लिलाव १० हजार ५०० रु. रोहिदास पानसरे यांनी घेतला.
श्रावणी सोमवारी जो पहिला भाविक असेल त्याला महापूजेचा मान देण्यात येईल. भाविकांसाठी मंदिर सकाळी ६ वा. दिंडी दर्शनासाठी उघडले जाईल. भाविकांसाठी यात्रेतील दुकाने, पाळणे यांना ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील, असे टी. वाय. मुजावर यांनी सांगितले.

Web Title: Nagpanchami's traditional Gram Sabha debate