शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

फुलंब्रीत नगर परिषदऐवजी नगर पंचायत होणार

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

--------------------

--------------------
फुलंब्री : येथील मतदारसंख्या साडेतेरा हजार असताना लोकसंख्या केवळ साडेसोळा हजार दाखविल्याने नगर परिषद होण्याऐवजी नगर पंचायत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तहसील प्रशासनाने केलेल्या या अक्षम्य चुकीमुळे फुलंब्रीकर नगर परिषदेला मुकणार आहेत.
एक वर्षापूर्वी तत्कालीन आघाडी सरकारने तालुकास्तरावरील गावाला नगर परिषद किंवा नगर पंचायत करण्याचा निर्णय घेतला होता. तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने मंजूर करून त्यावर अंमलबजावणी करण्याचे काम सुरू झाले होते. शासनाच्या निर्णयानुसार तालुकास्तरावरील शहराची लोकसंख्या २५ हजारांपेक्षा जास्त असेल, तर त्या शहरात नगर परिषद करण्यात येईल, तसेच ज्या तालुकास्तरावरील शहराची लोकसंख्या दहा हजार ते २५ हजारांपर्यंत आहे, तेथे नगर पंचायत करण्यासंबंधी आदेश शासनाचे अव्वर सचिव एस.डी. आहेर यांनी पारित केले होते. त्यानुसार प्रत्येक तालुका स्तरावरील शहराची माहिती मागविण्यात आली होती.
फुलंब्री येथील तहसील कार्यालयाने याविषयी शहराची लोकसंख्या १६ हजार दाखविली. वास्तविक पाहता हा आकडा सर्रास खोटा आहे. साडेतेरा हजार मतदार असताना लोकसंख्या सोळा हजार कशी असू शकते? याबाबत संबंधित अधिकार्‍यांनाही वाटले नाही. तहसील कार्यालयाच्या या अक्षम्य चुकीमुळे फुलंब्रीत नगर परिषदऐवजी नगर पंचायत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तहसील प्रशासनाने पाठविलेला १६ हजार लोकसंख्येचा आकडा कोणत्या आधारावर पाठविला, याचा उलगडा झालेला नाही.
फुलंब्री शहरात सुमारे साडेआठ हजार कुटुंबे आहेत. त्यांच्याकडे स्वतंत्र रेशन कार्ड आहेत. शहराची लोकसंख्या ३० हजारांपर्यंत असताना ती कमी का दाखविण्यात आली? यामुळे येथे नगर परिषद होण्याची आशा मावळली आहे. तालुक्याचा विचार केला तर फुलंब्री तालुका औरंगाबाद शहराच्या इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वांत जवळचा आहे. येथे अनेक छोटे-मोठे उद्योग-व्यवसायात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे येथे नगर परिषद होणे आवश्यक आहे.
तक्रारी नोंदविल्या
दरम्यान, तहसील प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात सोळा हजार लोकसंख्या दाखविल्याने त्याच्या विरोधात अनेकांनी आक्षेप नोंदविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन देशमुख, पंचायत समितीचे उपसभापती रऊफ कुरेशी यांनी तक्रारी नोंदविल्या असताना जिल्हाधिकार्‍यांनी दखल दिली नाही.
नगर परिषदऐवजी नगर पंचायत झाली तर शहराचा विकास होणे शक्य होणार नाही. नगर पंचायतसंबंधी जिल्हाधिकारी स्तरावर कारवाई सुरू आहे. सुधारित लोकसंख्या पाठविण्याची तसदी घेतली तर अजूनही नगर परिषद होण्याचा मार्ग मोकळा आहे.