शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

...अन् एका रात्रीत 'त्या' रिक्षावाल्याचं नशीबच पालटलं; लागली 50 लाखांची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 09:35 IST

रिक्षावाल्याला नागालँडमध्ये 50 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे.

गुवाहाटीः कोणाचं नशीब कधी बदलेल याबाबत काहीही सांगता येत नाही. पश्चिम बंगालमधला एक रिक्षावाला हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाची उपजीविका करत होता. त्याच रिक्षावाल्याला नागालँडमध्ये 50 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. 50 लाखांची लॉटरी लागल्यानं तो रिक्षावाला रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला. पश्चिम बंगालमधल्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गुस्करामध्ये वास्तव्याला असलेल्या गौर दास यांना रविवारी नागालँड सरकारची स्टेट लॉटरी लागली. मीडिया रिपोर्टनुसार, दास आणि त्याच्या संघटनेची माणसं नागालँडला पिकनिकला जाण्याच्या तयारीत होते. परंतु मुसळधार पावसामुळे त्यांची पिकनिकच रद्द झाली. त्याचदरम्यान एका लॉटरी विक्रेत्यानं दास यांच्यावर तिकीट खरेदी करण्याचा दबाव टाकला, त्यानंतर घरी परतत असतानाच त्यांनी लॉटरीचं तिकीट काढलं.  

  • तिकीट खरेदी करण्यासाठी लॉटरी विक्रेत्यानं टाकला होता दबाव

खरं तर गौर दास यांना लॉटरीचं तिकीट खरेदी करायचं नव्हतं, परंतु लॉटरी विक्रेत्यानंच त्याच्यावर तिकीट खरेदी करण्यासाठी दबाव टाकला. दास सांगतात, माझ्याकडे फक्त 70 रुपये होते आणि त्याचदरम्यान लॉटरी विक्रेत्यानं तिकीट घेण्याचा आग्रह केला. त्यामुळे मी ते तिकीट खरेदी केलं. रविवारी दुपारी दास एका दुकानावर लॉटरीचा रिझल्ट पाहण्यासाठी आले असता, त्यावेळी त्यांना लॉटरीच्या स्वरूपात 50 लाखांचं बक्षीस लागल्याचं समजलं. त्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. सोमवारी त्यांनी तिकीट बँकेत जमा केलं. माझी आई आणि पत्नी मजुरी करायचे, असंही ते रिक्षावाले सांगतात. दास यांना दोन मुली आणि एक मुलगासुद्धा आहे. एवढ्याशा पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा दास यांना काहीसं कठीण जात होतं. त्यातच त्यांना ही लॉटरी लागल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.