शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ओवेसीचा निषेध म्हणून मुस्लिमांनी रक्ताने लिहिलं 'भारत माता की जय'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 15:37 IST

असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय' बोलणार नाही केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत असताना मीरतमधील मुस्लिमांनी रक्ताने 'भारत माता की जय' लिहित आपला निषेध नोंदवला

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १८ - ऑल इंडिया मजलीस इत्तेहदुअल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय' बोलणार नाही केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत असताना मीरतमधील मुस्लिमांनी रक्ताने 'भारत माता की जय' लिहित आपला निषेध नोंदवला. मीरतमधील मुस्लिम बांधवांनी ओवेसीच्या वक्तव्याचा निषेध करत बच्चा पार्कमध्ये मोर्चा काढला. ओवेसी यांनी राजकीय फायद्यासाठी हे वक्तव्य केल्याचा आरोप आंदोलनकर्त्या मुस्लिमांनी केला आहे. 
 
असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय' बोलणार नाही केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना आता आपल्याच लोकांच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे. मुस्लिम समाजाचे नेते मोहम्मद इमाम यांनी आपल्या समर्थकांसह हा मोर्चा काढला होता. 'इस्लाम आपल्या लोकांना देशावरचं प्रेम व्यक्त करण्यापासून आणि घोषणा देण्यापासून रोखत नाही. ओवेसी यांचं वक्तव्य देशविरोधी असून ते अमान्य असल्याचं', मोहम्मद इमाम यांनी यावेळी सांगितलं. 
 
इंजेक्शनच्या सहाय्याने इमाम यांचं रक्त काढण्यात आलं आणि त्याच रक्ताने समर्थकांनी भारताच्या नकाशावर 'भारत माता की जय' लिहित आपला निषेध नोंदवला. 'ओवेसी इस्मामला बदनाम करत आहेत. आपण भारतीय आहोत आणि 'भारत माता की जय' म्हणणं आपली जबाबदारी असल्याचं', मोहम्मद इमाम यावेळी बोललेत.