शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जात-धर्म विसरून, कर्फ्यूमध्ये 'तो' गर्भवती महिलेच्या मदतीला धावला, जणू देवच पावला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 11:37 AM

जिल्ह्यात जातीय तणाव असताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन

हैलाकांडी: जिल्ह्यात जातीय तणाव असताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवणारी घटना आसामच्या हैलाकांडीत घडली. हैलाकांडीत जातीय तणाव असल्यानं रविवारी संचारबंदी लागू होती. त्यामुळे एका गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणतंही वाहन उपलब्ध नव्हतं. अशा परिस्थितीत शेजारी राहणारी मुस्लिम व्यक्ती त्या महिलेच्या मदतीला धावली. महिला वेळेवर रुग्णालयात पोहोचल्यानं तिची व्यवस्थित प्रसूती झाली. तिनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. रविवारी घडलेली ही घटना बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी महिलेच्या घरी भेट दिल्यानं प्रकाश झोतात आली. जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्यानं नंदिता यांना रुग्णालयात जाण्यासाठी वाहन मिळत नव्हतं. त्यांचे पती रुबन दास चिंतेत होते. राजयेशपूर गावात वास्तव्यास असणाऱ्या या दाम्पत्यांना अनेकांना मदतीसाठी फोन केले. पण संचारबंदी लागू असल्यानं कोणीही मदत करायाला पुढे आलं नाही. नंदिता यांच्या प्रसूतीकळा वाढत होत्या. त्यावेळी शेजारी राहणारा रुबन यांचा मित्र मकबूल हुसेन लस्कर मदतीला धावला. संचारबंदीचा पर्वा न करता मकबूलनं रुबन आणि नंदिता यांना स्वत:च्या रिक्षातून रुग्णालयात दाखल केलं. रुबन माझा शेजारी आहे. त्याच्या पत्नीला वेदना सुरू होत्या. त्यामुळे मी संचारबंदी असतानाही रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला, असं मकबूल यांनी सांगितलं. आम्ही संध्याकाळी 5 वाजता निघालो. 20 मिनिटांत रुग्णालयात पोहोचलो. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत प्रसूती झाली, अशी माहिती त्यांनी दिली. वेळेवर मदतीला धावल्याबद्दल रुबन यांनी मकबूल यांचे आभार मानले. नंदिता आणि रुबन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. मकबूल यांनी केलेल्या मदतीचं रुग्णालयाच्या प्रशासनानंही कौतुक केलं. जिल्ह्यात जातीय तणाव असताना मकबूल यांनी केलेली मदत हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवणारी असल्याचं एस. के. रॉय नागरी रुग्णालयाचे प्रशासक भास्कर दास यांनी म्हटलं.  

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीमPregnancyप्रेग्नंसी