शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

संशयामुळेच खुनी हल्ला

By admin | Updated: February 14, 2015 01:07 IST

आरोपींचा पीसीआर : हत्यार फेकले, वाहन जप्त

आरोपींचा पीसीआर : हत्यार फेकले, वाहन जप्त
नागपूर : सीताबर्डीतील मद्य व्यावसायिक राजीव ऊर्फ राजू जयस्वाल यांच्यावर गुरुवारी दुपारी झालेला प्राणघातक हल्ला व्यावसायिक स्पर्धेतील संशयामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात आरोपी पप्पू ऊर्फ महेश फुलचंद जयस्वाल (वय ४९) आणि अशोक संपत वाघमारे (वय ५५) या दोघांना अटक करून त्यांचा आज कोर्टातून सोमवारपर्यंत पीसीआर मिळवला.
आरोपी पप्पू जयस्वाल हा एमआयडीसीत रायफल बार चालवत होता. बार मालकाने अनधिकृत बांधकाम केल्यामुळे नासुप्रने २ फेब्रुवारीला रायफल बारचे अतिक्रमण तोडले. राजू जयस्वाल यांनीच तक्रार केल्यामुळे ही कारवाई झाली, असा संशय आरोपी पप्पूला होता. त्यामुळे त्याने कुख्यात गुन्हेगार अशोकच्या मदतीने गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास राजू यांच्या होंडा सिटी कारला सेंट झेवियर स्कूलजवळ महिंद्रा कारची जोरदार धडक मारली. धोका लक्षात घेत राजू यांनी कारमधून पळ काढला असता आरोपींनी त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचे प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर अशोकने चाकूचा घाव घालण्याचे प्रयत्न केले तर पप्पूने रॉडने जोरदार हल्ला चढवला. या हल्लयात गंभीर जखमी झालेल्या राजू यांच्यावर वोक्हार्टमध्ये उपचार करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी पप्पू आणि अशोकला अटक केली. त्यांचे वाहनही जप्त केले. आज त्यांना कोर्टात हजर करून त्यांची चार दिवसांची कोठडी मिळवली. आरोपींकडून चाकू जप्त करायचा आहे, असे पोलीस सांगतात.