शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
2
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
3
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
4
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
5
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
8
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
9
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
10
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
11
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
12
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला यलो अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:47 IST

Mumbai Weather Update : भारतीय हवामान खात्याने २१ जूनपर्यंत मुंबई, ठाणे आणि रायगडसह महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड आणि महाराष्ट्राच्या इतर अनेक भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. १७ मे ते २१ मे २०२५ दरम्यान विजांच्या गडगडाटासह, मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीच्या बुलेटिननुसार, रविवार, मंगळवार आणि बुधवारी मुंबईत यलो अलर्ट जारी राहील. तर, २१ जूनपर्यंत राज्यभरात मान्सून पूर्णपणे सक्रिय होणार असून, या दरम्यान देखील यलो अलर्ट राहणार आहे.  

'या' जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा 

तर, ठाणे आणि रायगड सारख्या मुंबई शेजारील जिल्ह्यांमध्ये रविवार ते बुधवारपर्यंत यलो अलर्ट जारी राहील. त्यामुळे, आज मुंबई आणि ठाण्यासह महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण प्रदेशाबाहेरही हा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार दिवसांसाठी, उर्वरित महाराष्ट्रातही हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यात पुढील पाच दिवस सतत पाऊस पडेल, गडगडाटी वादळे आणि सोसाट्याचे वारे येतील, असे आयएमडीचे शास्त्रज्ञ अखिल श्रीवास्तव यांनी म्हटले. मध्य भारतातही अशीच हवामान परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मान्सूनपूर्व पाऊस पडत असल्याने शनिवारी मुंबईच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली.

मान्सून लवकर हजेरी लावणार!

यंदाचा दक्षिण-पश्चिम मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. २१ ते २२ मे दरम्यान मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागने वर्तवला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व हवामान बदल जाणवू लागले आहेत. राज्यावर उच्च स्तरावरील चक्रीय वाऱ्यांचे परिसंचरण तयार झाले असून त्यामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. या बदलामुळे पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांत पुढील काही दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी विजांसह जोरदार सरी कोसळू शकतात.

टॅग्स :weatherहवामान अंदाजMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईRainपाऊस