"मिस्टर 56 चीनला घाबरतात"; काँग्रेस नेते राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 06:34 PM2021-09-24T18:34:52+5:302021-09-24T18:37:28+5:30

Rahul Gandhi slams PM Modi: राहुल गांधींनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात भारत-चीन सीमा वादाशी संबंधित काही बातम्या दिसत आहे.

"Mr. 56 fears China"; Congress leader Rahul Gandhi criticizes Prime Minister Narendra Modi over indo-china dispute | "मिस्टर 56 चीनला घाबरतात"; काँग्रेस नेते राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

"मिस्टर 56 चीनला घाबरतात"; काँग्रेस नेते राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

googlenewsNext

नवी दिल्ली:काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. राहुल गांधींनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात भारत-चीन सीमा वादाशी संबंधित काही बातम्या दिसत आहे. या बातम्यांमधूनच राहुल गांधींनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओसोबत एक कॅप्शनही लिहीलं आहे. त्यात त्यांनी "मिस्टर 56 चीनला घाबरतात'', असं म्हणत मोदींवर निशाणा साधलाय. यापूर्वीही राहुल गांधींनी ट्विटरवर चीननं लडाखजवळ शस्त्रं तैनात केल्याचा आणि युद्धाचा सराव करत असल्याची एक बातमी शेअर केली होती. यासोबतच त्यांनी लिहीलं होतं, "सीमेवर आपण एका नव्या युद्धाभ्यासाचा सामना करत आहोत. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही."

'कुटुंबप्रमुखाला जनतेचा आवाजच ऐकू येत नाही', बलात्काराच्या वाढत्या घटनांवरुन चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र

सीमा सुरक्षा से जुड़े मुद्दे लगातार उठा रहे हैं राहुल गांधी
गौरतलब है कि राहुल गांधी लगातार सीमा सुरक्षा से जुड़े मुद्दों को उठाते रहे हैं. चाहे वह सोशल मीडिया हो, मीडिया हो या फिर जनसभाएं हो, उन्होंने कई मौको पर सीमा सुरक्षा से जुड़े विषयों पर अपनी प्रतिक्रिया दी है और उनके निशाने पर केंद्र की सरकार रही है.

हिमाचल प्रदेशात पावसाचा थैमान, मगील 24 तासात 10 तर या वर्षात 432 जणांचा मृत्यू

भारत-चीन दरम्यान संघर्ष सुरू
गेल्या वर्षी चीन आणि भारतीय सैन्यात हिंसक चकमक झाली होती. त्यात अनेक सैनिक शहीद झाले होते. त्या घटनेपासून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे. हा वाद शांत करण्यासाठी अनेकदा बैठकाही झाल्या. पण, अद्यात प्रकरण शांत झालेलं नाही. त्या घटनेपासून अनेकदा राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर चीनला भारताची जमीन दिल्याचा आरोप करत आहेत.

Web Title: "Mr. 56 fears China"; Congress leader Rahul Gandhi criticizes Prime Minister Narendra Modi over indo-china dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.