शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

संसदेच्या कँटिनमधील सबसिडी खासदारांनी सोडली; दरवर्षी १७ कोटी रुपये वाचणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 15:19 IST

सर्वपक्षीय खासदारांचा एकमतानं निर्णय

नवी दिल्ली: संसदेच्या कँटिनमध्ये मिळणाऱ्या जेवणावरील सबसिडी सोडण्याचा निर्णय सर्व खासदारांनी एकमतानं घेतला आहे. त्यामुळे यापुढे खासदारांना संसदेच्या कँटिनमध्ये सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ मिळणार नाहीत. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येत हा निर्णय घेतला. खासदारांना संसदेच्या कँटिनमध्ये दिल्या जाणाऱ्या सबसिडीवर दरवर्षी १७ कोटी रुपये खर्च होतात. आता खासदारांनी सबसिडी सोडण्याचा निर्णय घेतल्यानं ही रक्कम वाचू शकेल. खासदारांनी संसदेच्या कँटिनमध्ये मिळणारी सबसिडी सोडावी, असं आवाहन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं. या आवाहनाला सर्व खासदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संसदेच्या कँटिनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर खासदार, अधिकाऱ्यांना सबसिडी मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा वादग्रस्त ठरला होता. खासदारांना इतक्या सोयी-सुविधा, वेतन आणि भत्ते मिळत असताना त्यांना कँटिनमधील खाद्यपदार्थांवर सबसिडी देण्याची गरज काय, असा सवाल वारंवार उपस्थित केला जात होता. या वर्षाच्या सुरुवातीला उत्तर रेल्वेनं लोकसभा सचिवालयाकडे १६.४३ कोटी रुपयांची मागणी केली होती. संसदच्या कँटिनमधील जेवणावर दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवरील सबसिडीची भरपाई म्हणून उत्तर रेल्वेनं ही रक्कम मागितली होती. एका माहिती अधिकार अर्जातून ही आकडेवारी समोर आली होती. संसदेच्या कँटिनची जबाबदारी उत्तर रेल्वेकडे आहे. संसदेच्या विविध विभागांमध्ये खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्याचं काम उत्तर रेल्वेकडून केलं जातं.  

टॅग्स :Parliamentसंसद