'गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांवर आहूती दिल्यानं १२ तास सॅनिटाईज राहतं घर'; भाजप मंत्र्याचा अजब दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 05:30 PM2021-03-08T17:30:25+5:302021-03-08T17:50:59+5:30

कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. अशाच आता एका भाजप मंत्र्यानं कोरोनाला रोखण्यासाठी वैदिक उपचारांबाबत एक अजब दावा केला आहे.

MP minister usha thakur says havan of cow dung cake can keep house sanitised for 12 hours | 'गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांवर आहूती दिल्यानं १२ तास सॅनिटाईज राहतं घर'; भाजप मंत्र्याचा अजब दावा!

'गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांवर आहूती दिल्यानं १२ तास सॅनिटाईज राहतं घर'; भाजप मंत्र्याचा अजब दावा!

Next

इंदूर- कोरोनाच्या महामारीला १ वर्ष उलटलं तरिही अजूनही कोणतेही उपचार सापडलेले नाहीत. कोरोनाचे लसीकरण सुरू झाले असले तरी प्रसाराचा वेग तसाच आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. अशाच आता एका भाजप मंत्र्यानं कोरोनचा प्रसार रोखण्यासाठी वैदिक उपचारांबाबत एक अजब दावा केला आहे.

मध्यप्रदेशातील संस्कृती आणि अधात्ममंत्री उषा ठाकूर यांनी कोरोनापासून बचावासाठी वैदिक पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. याव्यतिरिक्त त्यांनी  सुर्योदय आणि सुर्यास्ताच्यावेळी गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांवर  तुपाने आहूती  दिल्यास  घर १२ तासांपर्यंत संक्रमणमुक्त आणि सॅनिटाईज राहू शकतं, असं मत व्यक्त केलं आहे.  

त्यांनी सांगितले की, ''तुम्ही  गाईच्या दुधापासून बनलेल्या तुपात अक्षता मिसळून  ठेवून द्या. सर्योदय आणि सुर्यास्ताच्यावेळी गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांवर आहूती द्या. यावेळी अक्षता मिसळलेल्या तुपाचा वापर करा. यामुळे १२ तासांपर्यंत घर सॅनिटाईज राहायला मदत होईल.''

''काही लोकांना माझं बोलणं अजब वाटू शकतं'', उषा ठाकूर

५५ वर्षीय ठाकूर म्हणाले की, ''लोकांना माझे शब्द विचित्र वाटू शकतात, परंतु घराला संसर्गमुक्त ठेवण्याची ही कृती मनावर घ्यायला हवी. हे विज्ञान आहे की जेव्हा भगवान सूर्य उगवतात किंवा आकाश वर बसतात तेव्हा गुरुत्वाकर्षण शक्ती (पृथ्वीची) २० पटीपर्यंत वाढते. संध्याकाळी (वातावरणात) ऑक्सिजन कमी प्रमाणात असतो, जर या वेळी आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन हवा असेल तर तुपाच्या आहूतीमुळे वातावरण चांगले राहते.''

Web Title: MP minister usha thakur says havan of cow dung cake can keep house sanitised for 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.