लग्नघरात शोककळा, वराच्या कारखाली चिरडून वडिलांचा मृत्यू, वधूचा भाऊ गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:50 IST2025-11-27T14:50:22+5:302025-11-27T14:50:51+5:30
घरात विवाहसोहळ्यामुळे आनंदी वातावरण असतानाच घडलेल्या एका भीषण दुर्घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरल्याची घटना ओदिशामधील बलांगीर जिल्ह्यात घडली आहे. येथील बेलपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडल गावामध्ये वराची कार अचानक वेगाने पुढे गेली आणि त्याखाली वरातीत नाचत असलेले काही जण चिरडले गेले.

लग्नघरात शोककळा, वराच्या कारखाली चिरडून वडिलांचा मृत्यू, वधूचा भाऊ गंभीर जखमी
घरात विवाहसोहळ्यामुळे आनंदी वातावरण असतानाच घडलेल्या एका भीषण दुर्घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरल्याची घटना ओदिशामधील बलांगीर जिल्ह्यात घडली आहे. येथील बेलपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडल गावामध्ये वराची कार अचानक वेगाने पुढे गेली आणि त्याखाली वरातीत नाचत असलेले काही जण चिरडले गेले. या आपघातात वराचे वडील गिभलू बाग यांचा जागीच मृत्यू झाला. तर वधूचा भाऊ गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार वधूचं कुटुंब लोइसिंहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमपाली गावातून लग्नासाठी मंडल गावात पोहोचले होते. रात्री वरात सुरू झाली आणि ढोल-ताशांच्या गजरात नातेवाईक वराच्या कारसमोर नाचू लागले. याचदरम्यान, वराला घेऊन येत असलेली कार अचानक वेगाने पुढे सरकली आणि त्याखाली काही वऱ्हाडी मंडळी चिरडली गेली. त्यात वराचे वडील गिभलू बााग यांचा जागीच मृत्यू झाला. तर वधूचा भाऊ गंभीर जखमी झाला, त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.
या दु:खद घटननेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा पसरली होती. मात्र दोन्ही कुटुंबांनी परस्पर सहमतीने लग्नाचे रीतीरिवाज पूर्ण करण्याचे ठरवले. अर्धवट राहिलेल्या लग्नामुळे आणखी काही समस्या निर्माण होऊ शकतात, अशी भीती कुटुंबीयांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी दु:खाचा प्रसंग असतानाही त्यांनी लग्नाचे विधी पूर्ण केले.