इसिसचा सर्वाधिक धोका गोव्याला

By Admin | Updated: March 26, 2016 22:06 IST2016-03-26T22:06:41+5:302016-03-26T22:06:41+5:30

इसिसचा सर्वाधिक धोका गोव्याला असल्याची सूचना येथील यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे गोवा अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

The most dangerous of this is Goa | इसिसचा सर्वाधिक धोका गोव्याला

इसिसचा सर्वाधिक धोका गोव्याला

- सतर्क राहण्याच्या सुरक्षा यंत्रणांना सूचना

पणजी : इसिसचा सर्वाधिक धोका गोव्याला असल्याची सूचना येथील यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे गोवा अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
इंडियन मुजाहिद्दीन आणि अल कायदाचा धोका गोव्याला असल्याच्या सूचना राज्यातील आयबीसारख्या गुप्तचर विभागाकडून वारंवार मिळत होत्या. आता इसिसचाही धोका असल्याचे उघड झाले आहे. तशा सूचना मिळाल्याची माहिती राज्याच्या पोलीस मुख्यालयातील सूत्रांनी दिली. इसिसच्या हिट लिस्टमध्ये गोव्याचे नाव सर्वांत वर असल्याचे या सूचनेत स्पष्ट म्हटले आहे. गोवा पोलीस मुख्यालयातील सूत्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ असल्यामुळे परदेशातील लोक येथे मोठ्या संख्येने येतात. त्यांची जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी घातपात घडविण्याचा इसिसचा कट असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. युरोप, अमेरिका आणि रशियातील पर्यटक जेथे जास्त आहेत, त्या जागा अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर आहेत. अतिरेकी कारवायांच्या संशयावरून अटक केलेल्या काही संशयितांकडून ही माहिती उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The most dangerous of this is Goa