Monsoon Update: मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 02:30 IST2025-05-12T02:30:03+5:302025-05-12T02:30:20+5:30

Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस वादळी वारे अन् पाऊस; ६ जूनपासून सुरू होईल मान्सूनचा प्रवास

monsoon has arrived in nicobar islands when will it reach us | Monsoon Update: मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

Monsoon Update: मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : यंदा मान्सून २७ मे २०२५ पर्यंत केरळ किनाऱ्यावर पोहोचणार आहे. गेल्या १७ वर्षांतील म्हणजेच २००८ पासून प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या चार दिवस आधी केरळमध्ये येणार आहे.

सध्या मान्सून निकोबार बेटे, दक्षिण अंदमान समुद्र, पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागांत पोहोचला आहे. नैऋत्य मोसमी वारे माले, पूर्व बंगाल उपसागर, निकोबार बेट व मध्य अंदमान समुद्रातून जातो. १५ किंवा १६ मेपर्यंत मान्सून वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग, दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग आणि संपूर्ण अंदमान बेटे व्यापेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील २ दिवसांत बहुतेक राज्यांत पावसाची शक्यता आहे. १४ मे पर्यंत महाराष्ट्रात वादळीवाऱ्यांसह  पावसाचा अंदाज आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, प. बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू व सिक्कीममध्येही पावसाची शक्यता आहे.  

६ जूनपासून महाराष्ट्रात सुरू होईल मान्सूनचा प्रवास

१५ मे : अंदमान आणि निकाेबार
१ जून : केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप, आसाम, मेघालय
५ जून : गोवा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, पश्चिम बंगाल
६ जून : महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचे किनारपट्टी व्यतिरिक्त जिल्हे,
१० जून : मध्य महाराष्ट्र, मुंबई, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, बिहार
१५ जून : गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश 
२० जून : गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली
२५ जून : राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश
३० जून : राजस्थान, नवी दिल्ली

 

Web Title: monsoon has arrived in nicobar islands when will it reach us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.