शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

धक्कादायक! आईनेच चार वर्षाच्या मुलीली दिली गरम तव्यावर बसण्याची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 11:17 AM

आईने स्वतःच्या चार वर्षाच्या मुलीला गरम तव्यावर बसण्याची शिक्षा दिली आहे.

ठळक मुद्देआईने स्वतःच्या चार वर्षाच्या मुलीला गरम तव्यावर बसण्याची शिक्षा दिली आहे. हैदराबादमधील एसआर नगरमध्ये ही घटना घडली असून आई व तिच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. 

हैदराबाद- आईने स्वतःच्या चार वर्षाच्या मुलीला गरम तव्यावर बसण्याची शिक्षा दिली आहे. हैदराबादमधील एसआर नगरमध्ये ही घटना घडली असून आई व तिच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. ललिता व तिचा साथीदार एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करतात. ललिता स्वयंपाकी म्हणून काम करते तर तिचा साथीदार वॉचमनचं काम करतो. हॉस्टेलमध्ये खेळतं असताना मुलीकडून एका व्यक्तीच्या लॅपटॉपचं नुकसान झालं. त्या व्यक्तीने याबद्दलची ललिताकडे तक्रार केल्यावर ललिताने चिमुरडीला मारहाण केली. पीडित मुलीला इजा झाली असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

श्रीकाकुलम जिल्ह्यातील इच्छापूरममध्ये रहिवासी असणारे पण सध्या एसआर नगरमधील हॉस्टेलमध्ये राहणारे 25 वर्षीय ललिथा महापात्रा आणि तिचा साथीदार वाय.प्रकाश शनिवारी त्यांच्या चार वर्षाच्या मुलीसह भरोसा सेंटरला गेले. पीडित मुलगी त्यांना सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर भेटली, असं सुरूवातीला त्या दोघांनी सांगितलं. पण नंतर ललिताच त्या मुलीची आई असल्याचं समोर आलं.   

सुरूवातीला ही मुलगी आम्हाला रेल्वे स्टेशनवर सापडली, असं त्यांनी सांगितलं. पण नंतर उलटतपासणी दरम्यान चार वर्षीय मुलगी माझीच असल्याची कबुली त्या महिलेने दिली, अशी माहिती एसआर नगर इन्स्पेक्टर मोहम्मद वाहीदुद्दीन यांनी दिली आहे. 

मुलीला मारत असताना ती गरम तव्यावर पडली आणि भाजली अशी कबुली ललिताने दिली आहे. मुलीची काळजी घेणं शक्य होत नसल्याने तिला सुरक्षित स्थळी पाठवायचं होतं म्हणून भरोसा सेंटरमध्ये गेल्याचं ललिताने म्हंटलं. तीन दिवसांपूर्वी ललिताने चिमुरडीला मारहाण केली. ललिता सध्या प्रकाशबरोबर राहते आहे पण तिने तिच्या पतीला घटस्फोट दिलेला नाही. ललिताची चार वर्षाची मुलगीही तिच्याबरोबर राहते. तीन वर्षापूर्वी ललिता आणि प्रकाश हैदराबादला आले होते. तेव्हापासून ते हॉस्टेलमध्ये काम करत आहेत. ललिताला मुलीपासून तिची सुटका करून घ्यायची होती, असा दावा शहरातील बाल हक्क कार्यकर्त्याने केला आहे. 

गरम तव्यावर बसवल्याने मुलीला पाठीवर व पायावर जखमा झाल्या आहेत. आईने जबरदस्तीने गरम तव्यावर मला बसवलं असं मुलीने सांगितल्याचं बलाल हक्कुला संघमचे अध्यक्षा अच्युता राव यांनी म्हंटलं आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस