शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मोहपा... रस्ते

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

कळमेश्वर व मोहपा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था

कळमेश्वर व मोहपा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
रहदारीस अडथळा : देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
मोहपा : कळमेश्वर तालुक्यातील मोहपा व कळमेश्वर परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दैनावस्थामुळे वाहनचालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील बहुतांश रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात. परंतु, या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पादचारी व वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.
परिसरातील गोंडखैरी ते बोरगाव, लोणारा-सावंगी, गुमथळा ते आष्टीकला, गुमथळा-सेलू, सेलू-कळंबी साहुली, धापेवाडा ते निळगाव पांदन रस्ता, निमजी ते आष्टीकला, गुमथळा ते उपरवाही, सावंगा ते लिंगा, कळमेश्वर - गोवरी-तोंडाखैरी, कळमेश्वर-घोराड-मोहपा या रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने होत असल्याचा आरोप काहींनी केला आहे. उबाळी गावातील रस्त्यालगतच्या घरातील सांडपाणी व गटाराचे पाणी रस्त्यावर सोडले जाते. त्यामुळे या मार्गावरून रहादारी करणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्याचीही चांगलीच फजिती होते. या ठिकाणी अनेकदा दुचाकी वाहने स्लिप झाल्याने अपघात घडले आहेत.
ब्राह्मणी येथे धापेवाडा आदासा -सावनेर मार्गावर व काटोल - वरुड या रस्त्यांचे काम संथगतीने सुरू आहे. खडीकरणाच्या कामासाठी खोदलेले रस्ते लवकर भरण्यात येत नसल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होते. रस्त्यातील खड्ड्यांची तातडीने डागडुजी होणे गरजेचे आहे. रस्त्यातील खड्यात पाणी साचून राहात असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्यालगत मजबूत नाल्या आवश्यकता असून रस्त्याच्या कडेला असलेले उकिरडे पसरले असून सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे.
ब्राह्मणी मार्गावर प्रवासी निवारा होता. या निवाऱ्याच्या इमारतीला भेगा पडल्यामुळे पाडण्यात आला. त्यानंतर येथे अद्यापही प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करण्यात आले नाही. काटोल रस्त्यावरदेखील प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करणे गरजेचे आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा करीत उभे राहावे लागते. अशावेळी प्रवासी निवारा नसल्याने त्यांचीही मोठी गैरसोय होते.
रस्त्याच्या दैनावस्थेमुळे परिसरातील मार्गात अनेकदा अपघात घडले. यात अनेकांना जखमी व्हावे लागले तर काहींना जीवही गमवावा लागला. कळमेश्वर -गोंडखैरी मार्गात अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश रस्त्याने जड वाहतूक केली जाते. त्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था होत आहे. परिसरातील या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.