शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक क्षेत्रातील ४५ उद्योगांना मोदींचा इशारा

By admin | Updated: March 1, 2017 04:27 IST

सार्वजनिक क्षेत्रातील प्रचंड तोट्यात सुरू असलेल्या ४५ उपक्रमांना मोदी सरकारने अंतिम इशारा दिला आहे.

हरीश गुप्ता,नवी दिल्ली- एअर इंडिया, भारतीय पर्यटन विकास महामंडळासह सार्वजनिक क्षेत्रातील प्रचंड तोट्यात सुरू असलेल्या ४५ उपक्रमांना मोदी सरकारने अंतिम इशारा दिला आहे. एक तर कामगिरी सुधारा अन्यथा निरोप घ्या. पंतप्रधान कार्यालयातील व निती आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या उद्योगांना वर्षांमागून वर्षे दरवर्षी होत असलेला एक लाख कोटीेंचा तोटा खाली आणण्याचा निर्धार मोदींनी केला आहे. प्रस्तावांपैकी एक हा एअर इंडियाला व्यावसायिक भागीदार शोधण्यासाठी वेगाने काम करीत आहे. एअर इंडियाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी २० हजार कोटी रुपयांची मदत दिल्यानंतरही काही उपयोग झालेला नाही. मोदी यांनी एअर इंडियाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांच्यासोबत नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत ही बाब स्पष्ट झाली. करदात्यांचा पैसा सरकार आणखी वाया घालवणार नाही, असे मोदी यांनी स्पष्ट करून परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी तीन महिने मुदत दिली. हॉटेल व्यवसायाशी सरकारला काही देणेघेणे नाही, हॉटेल व्यवसायातून सरकारने बाहेर पडलेच पाहिजे अशा निष्कर्षाला निती आयोग आला आहे. अपवाद फक्त दिल्लीतील ल्युटेन्समधील अशोक हॉटेलचा. गेल्या काही दिवसांत पंतप्रधानांचे कार्यालय आणि अर्थमंत्रालयाला तज्ज्ञांनी अनेकवेळा सादरीकरण केल्याचे समजते.>आयोगाने दिली यादीसार्वजनिक क्षेत्रातील आजारी असलेल्या ७४ कंपन्यांची यादी निती आयोगाने सोपविली. यात २६ कंपन्या बंद करण्याचा सल्ला देण्यात आला. शिवाय दोन कंपन्या आहे तशा ठेवाव्यात, दहा कंपन्यांत धोरणात्मक निर्गंुतवणूक करावी, २२ कंपन्यांचे पुनरुज्जीवन करावे. यात धोरणात्मक निर्गंुतवणुकीचा पर्याय आयोगाने दिला आहे.