शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे पतन अटळ

By admin | Updated: September 21, 2015 23:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाजाच्या सर्वच घटकांना दूर सारून आपल्या पतनाची पटकथा लिहीत आहेत. आता या देशातील शेतकरी त्यांच्यावर टीका करीत नाहीत तर अतिशय वाईट शब्दात त्यांचा समाचार घेत आहेत

मथुरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाजाच्या सर्वच घटकांना दूर सारून आपल्या पतनाची पटकथा लिहीत आहेत. आता या देशातील शेतकरी त्यांच्यावर टीका करीत नाहीत तर अतिशय वाईट शब्दात त्यांचा समाचार घेत आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी आश्वासने न पाळल्याबद्दल पंतप्रधानांवर हल्लाबोल केला.मथुरेत काँग्रेसच्या चिंतन बैठकीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी, ‘अ‍ॅप्पल’ कंपनीत नवा प्राण फुंकणारे स्टीव जॉब्स यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, जेव्हा रालोआचे पतन घडून येईल आणि स्वत:लाच सर्वाधिक नुकसान पोहोचविणारे नरेंद्र मोदी ‘बाहेर’ पडतील तेव्हा निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका चमूप्रमाणे एकजूट होऊन काम केले पाहिजे. अच्छे दिन येतील, असे आश्वासन मोदींनी शेतकऱ्यांना दिले होते. आता शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मी देशात जेथे जेथे जातो तेथे तेथे शेतकरी मोदींना शिव्या देतात. शेतकरी मोदींवर टीका करीत नाहीत तर अपशब्द वापरतात. युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत. तीनवेळा आश्वासने देऊनही अद्याप एक पद, एक पेन्शन मिळालेले नाही.मोदींनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. काँग्रेसने त्यांचे जेवढे नुकसान केले आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान ते स्वत:ला पोहोचवित आहेत. आम्ही आपले स्थान पक्के केले पाहिजे. मोदींचे पतन निश्चित आहे. ते बाहेर जातील तेव्हा जी जागा रिक्त होईल ती आम्हाला भरायची आहे. तुम्ही मोदींवरील हल्ले सुरूच ठेवा, असे आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केले. आकाश काळे आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले, तर संघ आणि भाजपचे सर्वजण आकाश काळे आहे, असेच म्हणतील. चिंतन बैठक जर संघाची असती आणि आकाश काळे आहे, असे भागवत म्हणाले असते, तर कुणीही त्याचा विरोध करून सत्य मांडण्याची हिंमत दाखविली नसती. आकाश काळेच आहे, असे सर्वांनी मान्य केले असते. काँग्रेसमध्ये मात्र असे नाही. संघ आणि काँग्रेसच्या विचारसरणी हाच मूलभूत फरक आहे. संघ ही विचारसरणी नसून ती हुकूमशाही प्रवृत्ती आहे. काँग्रेसची विचारसरणी हे विविधतेत एकतेची आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले.(वृत्तसंस्था)