शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नेताजींच्या फाईल्सवरून काँग्रेसची कोंडी करण्याचा मोदींचा निर्धार

By admin | Updated: September 21, 2015 09:21 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांच्या पहिल्या स्नेहमिलन कार्यक्रमाला नेताजींची जर्मनीत राहणारी कन्या उपस्थित राहावी, यासाठी पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांच्या पहिल्या स्नेहमिलन कार्यक्रमाला नेताजींची जर्मनीत राहणारी कन्या उपस्थित राहावी, यासाठी पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. येत्या आॅक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी हा ‘महत्त्वपूर्ण कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला नेताजींची कन्या अनिता बोस प्फाफ आणि त्यांची तिन्ही मुले, एवढेच नव्हे तर त्यांच्या पतीनेही उपस्थित राहावे, अशी मोदींची इच्छा आहे.पीएमओ कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेताजींची एकुलती एक कन्या अनिता बोस आपल्या तिन्ही मुलांसह या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, हे सुनिश्चित करण्यासाठी मोदींनी गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न चालविले आहेत. मोदींनी गेल्या एप्रिलमधील आपल्या जर्मनी दौऱ्याच्या वेळी अनिता बोस आणि त्यांच्या कुटुंबियांना बर्लिनला येण्यासाठी व्यक्तिगतरीत्या निमंत्रण पाठविलेले होते; परंतु बावेरिया ते बर्लिनपर्यंत लांबचा प्रवास करणे अतिशय कठीण जाईल, असे सांगून अनिता यांनी बर्लिनला भेट देण्यास असमर्थता दर्शविली होती. अनिता या बावेरिया येथे पती प्रा. मार्टिन प्फाफ यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. अनिता आणि मार्टिन यांना पीटर अरुण, थॉमस कृष्णा व माया कॅरिना अशी तीन अपत्ये आहेत. मुलांची भारतीय नावे ठेवून त्या भारताच्या संपर्कात असल्याबद्दल मोदींनी सुखद आश्चर्य व्यक्त केले होते. अनिता या नेताजींच्या एकमेव कन्या आहेत. त्यांचा जन्म व्हिएन्नात झाला होता. आॅक्टोबरमध्ये आयोजित केलेल्या या कौटुंबिक मेळाव्याच्या निमित्ताने नेताजींच्या वारशावरून आपला फायदा करून घेण्याचा व या मुद्यावरून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. नेताजींच्या कुटुंबातील किमान ५० च्या वर सदस्य आपल्या निवासस्थानी एकत्र येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी रविवारी जाहीर केले आहे, हे विशेष.