शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनासाठी आता मोदी‘निति’

By admin | Updated: January 2, 2015 02:48 IST

आपल्या ६५ वर्षांच्या इतिहासात २०० लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या १२ पंचवार्षिक आणि सहा वार्षिक योजना आखणारा नियोजन आयोग केंद्र सरकारने गुरुवारी अधिकृतपणे गुंडाळला

नियोजन आयोग गुंडाळला : राष्ट्रीय विकासात राज्यांचीही भागीदारी; केंद्राचा नवा ‘थिंक टँक’जयशंकर गुप्त - नवी दिल्लीआपल्या ६५ वर्षांच्या इतिहासात २०० लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या १२ पंचवार्षिक आणि सहा वार्षिक योजना आखणारा नियोजन आयोग केंद्र सरकारने गुरुवारी अधिकृतपणे गुंडाळला आणि त्याच्या जागी ‘राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था’ (नॅशनल इन्स्टिस्ट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया-एनआयटीआय-निति) नावाच्या राष्ट्रीय पातळीवरील नव्या संस्थेची स्थापना केली. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयाने एक सहा पानी निवेदन प्रसिद्ध करून या नव्या संस्थेचे स्वरूप, रचना व उद्देश याविषयीचा तपशील जाहीर केला.ही नवी संस्था केंद्र आणि राज्य सरकारांसाठी ‘थिंक टँक’ म्हणून काम करणार असून, पंतप्रधान तिचे अध्यक्ष राहतील़ गत १५ आॅगस्ट रोजी मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना नियोजन आयोग गुंडाळण्याचे सूतोवाच केले होते़ शिवाय यासंदर्भात विविध पोर्टल्सच्या माध्यमांतून सूचना आणि शिफारशी मागवल्या होत्या़ यापश्चात २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांची बैठकही बोलावली होती़ पंतप्रधानांनी बोलाविलेल्या या बैठकीत काँग्रेसचे काही मुख्यमंत्री वगळता बहुतांश मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या पुनर्गठनाच्या कल्पनेला समर्थन दिले होते़ त्यामुळे हा  आयोग इतिहासजमा झाल्याची फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी होते़ जुन्या योजना आयोगाच्या कार्यप्रणालीत फक्त केंद्राकडून राज्यांकडे अशा एकाच दिशने धोरणात्मक विचारांचे संक्रमण होत असे. मात्र आता स्थापन होत असलेली नवी संस्था ही देशतील सर्व राज्यांची निरंतर स्वरूपाची भागिदारी असेल, असे सरकारने म्हटले आहे. राज्ये बलवान असतील तरच देश सामर्थ्यशाली होऊ शकतो या वास्तवाचे भान ठेवून खऱ्या अर्थाने सहकारी संघराज्य व्यवस्थेतून विकासाची वाटचाल करण्याची दिशा ही संस्था ठरवील. नव्या रचनेमुळे अधिक अंतर-मंत्रालयीन तसेच केंद्र व राज्यांमधील समन्वय शक्य होणार असल्याने ठरलेली धोरणे प्रभावीपणे अंमलबजावणी करणे शक्य होईल, असेही सरकारचे म्हणणे आहे.निति आयोग काय करणार?च्योजना अंमलबजावणीवर देखरेख व त्याच्या मूल्यांकनासोबत टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनवर लक्ष देणे हे निति आयोगाचे प्रमुख कार्य असेल़ राज्यांमध्ये निधीवाटपाचे काम हा आयोग करणार नाही़ आयोग राज्यांच्या सल्ल्याने देशाच्या विकासाचा राष्ट्रीय अजेंडा तयार करून तो पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना सोपवेल़ च्सक्षम राज्य आणि सक्षक्त देशाच्या सिद्धान्तावर हा आयोग काम करेल़ जिल्हा स्तरापासून केंद्र स्तरावर योजना लागू होतील, अशी यंत्रणा तयार करण्याची जबाबदारी हा आयोग पेलेल़ याशिवाय धोरणकर्ते आणि संबंधित क्षेत्रांच्या तज्ज्ञांच्या सहकार्याने आर्थिक धोरणात राष्ट्रीय सुरक्षेचाही जिम्मा सांभाळेल़ च्निति आयोग सरकारसाठी ‘एक मार्गदर्शक आणि निति प्रोत्साहक’ म्हणून काम करेल़ शिवाय केंद्र आणि राज्य सरकारांना धोरणात्मक मुद्द्यावर रणनीतिक आणि तांत्रिक सल्ला देईल़ यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या आर्थिक मुद्द्यांचा समावेश असेल़ निति आयोग अन्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ‘थिंक टँक’शिवाय शैक्षणिक आणि धोरणात्मक संशोधन संस्थांच्या संपर्कात राहील़- आणखी वृत्त/७कशी असेल नवी रचना?अध्यक्ष : पंतप्रधाननियामक परिषद : सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल.क्षेत्रिय परिषदा : गरजेनुसार स्थापना. यात त्या भागातील राज्यांचे मुख्यमंत्री व नायब राज्यपाल.पूर्णवेळ सदस्य : संख्या कालांतराने ठरेल.अर्धवेळ सदस्य : जास्तीत जास्त दोन. देशातील नामांकित विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमधून आळीपाळीने निवड.पदसिद्ध सदस्य : जास्तीत जास्त चार केंद्रीय मंत्री. पंतप्रधानांकडून नामनिर्देशन.विशेष निमंत्रित : ठरावीक विषयाचे तज्ज्ञउपाध्यक्ष : पंतप्रधानाकडून नेमणूक. सरकारी सूत्रांनुसार अरविंद पानगढिया यांची नेमणूक शक्य.मुख्य कार्यकारी अधिकारी : निश्चित काळासाठी पंतप्रधानांकडून नियुक्ती. सचिवाचा हुद्दा.