शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी दिली गुरुकिल्ली !

By admin | Updated: September 6, 2014 03:25 IST

देश घडविण्यासाठी प्रत्येक सुशिक्षिताने आठवडय़ातील एक तास द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

शिक्षकदिनी विद्याथ्र्याशी संवाद : मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देणार
नवी दिल्ली : मुलींचे शिक्षण आपल्या प्राधान्यक्रमावर आहे. सर्व शाळांमध्ये शौचालय बांधण्याबद्दल उचललेली पावले याच प्रयत्नाचा भाग आहे. देश घडविण्यासाठी प्रत्येक सुशिक्षिताने आठवडय़ातील एक तास द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
समाजात परिवर्तन घडविण्याचे सामथ्र्य असलेल्या शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी विद्याथ्र्याना जोडावे, असे आवाहनही त्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशभरातील लक्षावधी विद्याथ्र्याशी आणि शिक्षकांशी ते संवाद साधताना केले. पंतप्रधानांचे हे भाषण दूरदर्शन, आकाशवाणीसह विविध वृत्तवाहिन्यांवर थेट प्रसारित आणि प्रक्षेपित करण्यात आले. राजधानीतील खचाखच भरलेल्या सॅम माणोकशॉ सभागृहात मोदी हजर होते. तेथे झालेल्या या कार्यक्रमात दिल्लीतल्या मुलांबरोबरच व्हिडीयो कॉन्फरिन्संगच्या माध्यमातून त्यांनी मुलांशी संवाद साधला. मुलांशी त्यांच्या हितगुजाच्या गप्पा करत त्यांनी मुलांची मने जिंकली. मुलींनी शिक्षण मधेच सोडू नये म्हणून शाळा त्यांच्या घरापासून जवळ असल्या पाहिजे, यासंदर्भात आपण राज्यांशी चर्चा करीत आहोत, असे मोदी म्हणाले. देशात शिक्षकांची कमतरता आहे. ही परिस्थिती बदलावी लागेल आणि भारत शिक्षक निर्यात करणारा देश झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.  सध्या हुशार मुले डॉक्टर, इंजिनिअर होण्याची स्वप्ने पाहतात. पण ही हुशार मुले भविष्यात शिक्षक का होत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधावे लागेल. जगभरात चांगले शिक्षक मिळत नाहीत. चांगले शिक्षक घडवण्यास प्रयत्न करायला हवेत. चांगले शिक्षक आपल्याला निर्यात करता येणार नाहीत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
मॉनिटर बनण्याचाही विचार नव्हता
देशाचा पंतप्रधान बनेन असा कधी विचार केला होता काय, असा प्रश्न एका विद्याथ्र्याने मोदींना प्रश्न विचारला. त्यावर मोदी म्हणाले, मी एका सामान्य कुटुंबातील आहे. मी कधी वर्गात मॉनिटर बनण्याचा विचार केला नाही तर पंतप्रधान बनण्याचा विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. 
 
मी खोडकर : बालपणी आपण खोडकर असल्याचे सांगून मोदी यांनी त्यासंदर्भात एक उदाहरण दिले. लगA समारंभात शहनाई वाजवणा:यांना आम्ही काही मित्र चिंच दाखवून त्रस देत होतो. चिंच बघून वाजवणा:यांच्या जिभेला पाणी सुटायचे आणि ते शहनाई नीट वाजवू शकायचे नाहीत. पण तुम्ही असं करणार नाही ना, असा सवाल करीत मोदींनी कोरसमध्ये मुलांकडून नो सर असे वचनही घेतले.