त्या भेटीवर मोदींनी माफी का मागितली नाही - कश्यप

By Admin | Updated: October 17, 2016 17:51 IST2016-10-16T13:45:21+5:302016-10-17T17:51:58+5:30

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेले सर्जिकल स्ट्राईक आणि त्यांनतर बॉलिवूडमधून आणि राजकारणातून पाक कलांकराबाबत वाढलेली नाराजगी यावर चर्चा सुरु असताना.

Modi did not ask for an apology - Kashyap | त्या भेटीवर मोदींनी माफी का मागितली नाही - कश्यप

त्या भेटीवर मोदींनी माफी का मागितली नाही - कश्यप

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेले सर्जिकल स्ट्राईक आणि त्यांनतर बॉलिवूडमधून आणि राजकारणातून पाक कलांकराबाबत वाढलेली नाराजगी यावर चर्चा सुरु असताना. यामध्ये चित्रपट दिगदर्शक अनुराग कश्यप यांनी आता उडी घेतली आहे. त्यांनी आता थेट मोदींवर निशाना साधाला आहे.

पाक पंतप्रधान नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाला पाकमध्ये जाऊन त्यांना शुभेच्छा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप माफी का मागितली नाही असा प्रश्न कश्यप यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे. त्यावर नेटीझन्समध्ये बरीच चर्चा झाली आहे.

Web Title: Modi did not ask for an apology - Kashyap