शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

मोदी व हिंदुत्ववादी RSSला पाकिस्तान करणार टार्गेट

By admin | Updated: October 8, 2016 17:33 IST

पाकिस्तानच्या सिनेटने, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या आरएसएसला टार्गेट करण्यासाठी 22 शिफारशी सुचवल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.8 - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने धसका घेतल्याचे दिसत आहे. दहशतवादाच्या मुद्यावरुन जागतिक पातळीवर एकटे पडण्याची चिन्हं दिसत असताना, बिथरलेला पाकिस्तान आता भारताविरोधात कटकारस्थान रचताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या सिनेटने, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या आरएसएसला टार्गेट करण्यासाठी 22 शिफारशी सुचवल्या आहेत. पॅनेलचे अध्यक्ष
राजा जफरुल हक यांनी 'मोदी आणि त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसणीच्या आरएसएसला निशाणा बनवणे' या शीषर्कांतर्गत सात पाने असलेल्या 22 शिफारशी पाकिस्तानातील संसदेच्या सभागृहात शुक्रवारी सादर केल्या. 
 
पाकिस्तानी वृत्तपत्र 'द एक्स्प्रेस ट्रिब्युन'च्या वृत्तानुसार, जाती-धर्मातील वाद, नक्षलवाद, माओवाद भारतातील या अंतर्गत समस्यांवरुन भारताला टार्गेट करण्याची रणनीती पाकिस्तानात सुरू आहे.  हिंदू,मुस्लिम, शीख, ख्रिचन, दलितांमध्ये जातीधर्मावरुन असलेली घृणा आणि नक्षलवाद-माओवाद या बाबी उजेडात आणून भारतातील विविध जातीधर्मात, समाजात कलह निर्माण करण्यासाठी, द्वेष पसरवण्यासाठी, भांडणं लावण्यासाठी, अशांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान कुटनीती आखत असल्याचे यावरुन स्पष्ट दिसत आहे.  तर दुसरीकडे, पाकिस्तानने बलुचिस्तान प्रातांत अटक केलेले रॉचे प्रमुख कुलभूषण यादव, काश्मीरमधील मानवाधिकाराचे उल्लंघन यांसारखे अनेक मुद्दे आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करायला हवे, असे देखील पाकिस्तानच्या सिनेटने म्हटले आहे.  
 
तसेच जे कट्टर मोदीविरोधक आणि त्यांच्या पाकिस्ताविरोधी धोरणाला विरोध करतात, अशा भारतीयांपर्यंत पोहोचण्याची शिफारसदेखील या पॅनेलने केली आहे.  तसंच पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटे पाडण्याचा भारताच्या धोरणालादेखील यावेळी विरोध करण्यात आला. तसंच, जम्मू-काश्मीरप्रकरणी चर्चा करण्यासाठी ओआयसी (Organisation of Islamic Cooperation )या 57 मुस्लिम देशांच्या संघटनेचाही समावेश करण्यात यावा, हा मुद्दा देखील यावेळी मांडण्यात आला. दरम्यान, काश्मीर प्रकरण ही भारताची अंतर्गत समस्या नसून ती आंतरराष्ट्रीय समस्या आहे, असे OIC ने ऑगस्टमध्ये म्हटले होते, अशी माहिती पाकिस्तानातील सूत्रांनी दिल्याचे द एक्स्प्रेस ट्रिब्युन म्हटले आहे.