शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन व्हॉलीबॉल खेळाडूची चाकूने वार करुन हत्या

By admin | Updated: March 26, 2016 13:29 IST

बारासात येथे अल्पवयीन मुलीची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली आहे. आपल्या मैत्रिणींसोबत व्हॉलीबॉल खेळत असताना तरुणाने चाकूने वार करुन हत्या केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
कोलकाता, दि. २६ - बारासात येथे अल्पवयीन मुलीची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली आहे. आपल्या मैत्रिणींसोबत व्हॉलीबॉल खेळत असताना तरुणाने चाकूने वार करुन हत्या केली आहे. संगिता असं या पिडीत मुलीचं नाव असून ती एक व्हॉलीबॉल खेळाडू होती. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याची पोलिसांना शंका आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र नंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसर्पण केलं.
 
आऱोपी सुब्रताने संगिताला प्रपोज केला होता मात्र संगीताने त्याला नकार दिला होता. संगिताची मॅच असल्याने ती मैदानावर प्रॅक्टीस करत होती. त्यावेळी सुब्रता तिथे आला आणि चाकूने वार करुन संगिताची हत्या केली. मी जेव्हा सुब्रताला चाकू घेऊन संगीताच्या दिशेने जाताना पाहिले तेव्हा खुर्चीच्या सहाय्याने मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. संगीताला मी माझ्या मागे उभं केलं होतं जेणेकरुन तिला वाचवता येईल. संगीताचं घर जवळच असल्याने घऱी जाण्याच्या हेतून संगीतने तेथून पळ काढला आणि सुब्रताने तिचा पाठलाग करत तिच्यावर वार केले अशी माहिती कोच स्वपन दास यांनी दिली आहे. 
 
मैदानावर हजर असलेल्या इतर मुली ही घटना पाहून बेशुद्ध पडल्या. स्थानिकदेखील घाबरले असल्याने कोणीही आरोपी सुब्रताला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. संगीताला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिचा मृत्यू झाला होता. हत्येचं नेमकं कारण पोलिसांना कळू शकलेलं नाही मात्र एकतर्फी प्रेमातूनच ही हत्या झाल्याची पोलिसांना शंका आहे. 
 
संगीताच्या कुटुंबियांनी याअगोदरही सुब्रताने संगीताला धमकावल्याचं सांगितलं आहे. पोलिसांकडे तक्रार करुनही पोलिसांनी लक्ष न दिल्याचा आऱोपही त्यांनी केला आहे. पोलिसांनी फेसबुकवरुन आरोपी सुब्रताचा फोटो मिळवून त्याचा शोध सुरु केला होता. मात्र आरोपीने नंतर स्वत:हून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत गुन्हा कबूल केला.