शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यात बलात्कार

By admin | Updated: January 3, 2015 02:45 IST

उत्तर प्रदेशच्या बदायूँ येथे दोन पोलीसांनीे एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर पोलीस ठाण्यातच सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

बदायूँतील भयंकर घटना : उत्तर प्रदेशासह अवघा देश हादरला, दोन्हीही फरार कॉन्स्टेबल बडतर्फ, कठोर कारवाईचे संकेत बदायूँ : उत्तर प्रदेशच्या बदायूँ येथे दोन पोलीसांनीे एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर पोलीस ठाण्यातच सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. बलात्कार केल्यानंतर हे दोन्ही पोलीस फरार झाले आहेत. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन या दोन्ही नराधम पोलिसांना तडकाफडकी सेवेतून बडतर्फ केले आहे. तसेच ठाण्याच्या एसएचओलाही निलंबित करण्यात आले आहे. कॉन्स्टेबल वीरपालसिंग यादव आणि अवनीश यादव अशी या पोलिसांची नावे आहेत. ते बरेलीचे राहणारे आहेत. त्यांनी ३१ डिसेंबर रोजी या अल्पवयीन मुलीचे तिच्या घरून अपहरण केले आणि तिला मुसाझाग पोलीस ठाण्यात आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या मुलीवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक लल्लन सिंग यांनी येथे पत्रकारांना दिली.या पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून दोन्ही पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले असून पोलीस त्यांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. या पोलिसांनी पोलीस ठाण्यातच आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे मुलीने आपल्या जबावात म्हटले आहे.पोलिसांवर कारवाईची गरजअल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यात पोलिसांकडून सामुहिक बलात्कार होण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. बदायूँ जिल्ह्यात बलात्कार आपदा केंद्र स्थापन करायला पाहिजे आणि येत्या काही महिन्यांत असे केंद्र स्थापन करण्यात येईल. दुसऱ्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी पोलीस स्वत:च कायदा मोडत आहेत आणि लोकांवर अत्याचार करीत आहेत. अशा पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री मनेका गांधी यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)याआधी दोन बहिणींच्या संशयास्पद मृत्यूने बदायूँ चर्चेत आले होते. बदायूँच्या काट्रा सादतगंज भागात दोन बहिणी एका झाडाला फाशी लावलेल्या स्थितीत आढळून आल्या होत्या. आता ३१ डिसेंबरला ओनला भागातही बलात्काराची घटना घडली आहे. रात्री ८ वाजता मी घरी एकटीच असताना दोन कॉन्स्टेबल कारने आल्याचे मी पाहिले. त्यांनी मला कारमध्ये बसण्यास सांगितले आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे त्यांनी मला एका खोलीत ठेवले आणि नंतर दोघांनीही लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी मला माझ्या गावाजवळ आणून सोडले’, असे पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यात बलात्कार करणाऱ्या दोन्ही पोलिसांना तत्काळ अटक करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिले आहेत. या दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.