शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

जगात भारताची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान, दिल्लीतल्या हिंसाचारावर गृहराज्यमंत्र्यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 10:21 PM

देशाचे गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, जगात भारताची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान रचलं जात आहे.

ठळक मुद्देशाचे गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, जगात भारताची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान रचलं जात आहेकाँग्रेस पक्ष आणि काही राजकीय दलांना मी विचारू इच्छितो याची जबाबदारी कोण घेणार?, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्याचं षडयंत्र केलं जात आहे. मी याचा निषेध करतो. शांततापूर्ण पद्धतीनं विरोध करणं आपला अधिकार आहे. हे कोणत्या प्रकारचं विरोध प्रदर्शन आहे.

नवी दिल्लीः दिल्लीतल्या मौजपूरमध्ये नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(NRC)च्या विरोधात सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनादरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठं विधान केलं आहे. देशाचे गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, जगात भारताची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान रचलं जात आहे. दिल्ली पोलिसांचा एक हेड कॉन्स्टेबल शहीद झाला आहे. काँग्रेस पक्ष आणि काही राजकीय दलांना मी विचारू इच्छितो याची जबाबदारी कोण घेणार?, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्याचं षडयंत्र केलं जात आहे.मी याचा निषेध करतो. शांततापूर्ण पद्धतीनं विरोध करणं आपला अधिकार आहे. हे कोणत्या प्रकारचं विरोध प्रदर्शन आहे. मी त्यांना इशारा देऊ इच्छितो की, हिंसा आणि अरेरावी सहन केली जाणार नसून कारवाई करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांना दोषींविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालय दिल्ली पोलिसांच्या संपर्कात असून, परिस्थितीची माहिती घेत आहे. पोलीस कमिश्नर अमूल्य पटनायक कंट्रोल रुममध्ये स्वतः उपस्थित आहेत.  

मिळालेल्या माहितीनुसार,  नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधावरुन दिल्लीत सोमवारी (24 फेब्रुवारी) तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक करण्यात आली असून यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. पेट्रोल पंप आणि काही गाड्या पेटवण्यात  आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणासाठी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. पोलिसांची संख्या अपूर्ण असल्याने निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात येणार आहे.

दिल्लीतील गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला असून तब्बल 37 पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. भजनपुरा, मौजपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा यामध्ये मृत्यू झाला. तर डीसीपी अमित शर्मा हे जखमी झालेत. जखमी पोलिसांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

CAA Protest : सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक, हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

China Coronavirus : दक्षिण कोरियात रेड अलर्ट! 'कोरोना'मुळे तब्बल 2,592 जणांचा मृत्यू

Donald Trump's India Visit : कौन है वो?... ट्रम्प-मोदी-मेलानिया यांच्यासोबत रेड कार्पेटवर चालणाऱ्या 'ती'ची गोष्ट

Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींच्या विमानात 'हा' आहे फरक

Donald Trump India Visit Live : Donald Trump: चहावाला ते पंतप्रधान... चक्क भाषण थांबवून मोदींजवळ गेले ट्रम्प!

Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्यासाठी 'ढोकळा', तर मोदींसाठी 'स्पेशल चहा', महामेजवानीमध्ये असणार 'हे' खास पदार्थ