अमृतसरमध्ये मिनीबसची रिक्षाला धडक, ९ ठार

By Admin | Updated: December 31, 2015 09:53 IST2015-12-31T09:45:30+5:302015-12-31T09:53:33+5:30

पंजाबमधील अमृतसर येथील मेहता रोडवर जीवन पांढेर गावाजवळ बुधवारी रात्री उशिरा एक मिनी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला.

Miniclip rickshaw hit in Amritsar, 9 killed in Amritsar | अमृतसरमध्ये मिनीबसची रिक्षाला धडक, ९ ठार

अमृतसरमध्ये मिनीबसची रिक्षाला धडक, ९ ठार

ऑनलाइन लोकमत 

अमृतसर, दि. ३१ -  पंजाबमधील अमृतसर येथील मेहता रोडवर जीवन पांढेर गावाजवळ बुधवारी रात्री उशिरा एक मिनी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत  नऊ जणांचा मृत्यू झाला असून, १५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलाचा समावेश आहे. 
या अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावाने पोलिस पोहोचण्याआधीच बस पेटवून दिली. मिनीबसने रिक्षाला दिलेली धडक इतकी जबरदस्त होती कि, रिक्षा काही फूटापर्यंत फरफटत गेली असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. 
या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, पाच जणांनी रुग्णालयाच्या वाटेवर असताना प्राण सोडला. पंजाब पोलिस फरार बस चालकाचा शोध घेत आहेत.  

Web Title: Miniclip rickshaw hit in Amritsar, 9 killed in Amritsar